AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अमित शाह, एकनाथ शिंदेंमध्ये 50 मिनिटं चर्चा, भाजपच्या या बड्या नेत्याची केली तक्रार? बैठकीत नेमकं काय घडलं?

मोठी बातमी समोर येत आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत, त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

मोठी बातमी! अमित शाह, एकनाथ शिंदेंमध्ये 50 मिनिटं चर्चा, भाजपच्या या बड्या नेत्याची केली तक्रार? बैठकीत नेमकं काय घडलं?
महायुती Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 19, 2025 | 8:49 PM
Share

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याचं पहायला मिळत आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. महाविकास आघाडीमधील नेते आणि पदाधिकारी तर भाजपात प्रवेश करतच आहेत, मात्र याचा सर्वात मोठा फटका हा भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला देखील बसल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर दिसून येत आहे. दरम्यान आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर होते, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे.

सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या भेटीदरम्यान एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यामध्ये जवळपास 50 मिनिट चर्चा झाली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे राज्यातील राजकीय घडामोडींचं कथन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे, मात्र काही नेते ते वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केला आहे.   विरोधकांना यामुळे आयतं कोलीत मिळतंय, मीडीयात नाहक उलटसुलट बातम्या येत आहेत. त्यामुळे जनमानसात उगाचच संभ्रम निर्माण होत आहे. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे,  युतीच्या विजयी घोडदौडीत त्यामुळे विनाकारण अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारतां येत नाही. काही नेते वैयक्तिक स्वार्थापोटी काम करत आहेत, त्यांच्याकडून अशा पध्दतीने काम यापुढे होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. तसेच युतीतल्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळली पाहिजे. भाष्य करताना प्रत्येकाने संयमाची आणि सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार शिंदे यांनी शाह यांच्याकडे केल्याची माहिती मिळत आहे. चव्हाणांकडून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडत असल्याचा आरोप शिंदेंकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...