Amravati Lockdown | अमरावतीत पुन्हा कडक ‘लॉकडाऊन’चे संकेत, यशोमती ठाकूर यांचे सूतोवाच

| Updated on: Feb 21, 2021 | 3:05 PM

अमरावती शहराच्या पंचवटी, राजकमल या भागात यशोमती ठाकूर यांनी भेटी दिल्यात. यावेळी त्यांनी रस्त्यावर येऊन पोलिसांशी संवाद साधला.

Amravati Lockdown | अमरावतीत पुन्हा कडक लॉकडाऊनचे संकेत, यशोमती ठाकूर यांचे सूतोवाच
यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री
Follow us on

अमरावती : अमरावती जिल्हात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अमरावती जिल्ह्यात (Yashomati Thakur Gave Signs About Lockdown In Amaravati) आज रविवारी कडकडीत लॉकडाऊन आहे. त्यामुळे आज अमरावती शहरात लॉकडाऊन कसा सुरु आहे, याच्या परिस्थितीचा आढावा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर या स्वतः घेत आहेत (Yashomati Thakur Gave Signs About Lockdown In Amaravati).

अमरावती शहराच्या पंचवटी, राजकमल या भागात यशोमती ठाकूर यांनी भेटी दिल्यात. यावेळी त्यांनी रस्त्यावर येऊन पोलिसांशी संवाद साधला. यावेळी अमरावतीत वाढत असलेली कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक असून अमरावती जिल्हात पुन्हा 10ते 15 दिवसाचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसे सूतोवाच यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले.

तर यावेळी विनाकारण फिरणाऱ्या लोकांना त्यांनी यावेळी पोलिसांन समवेत तंबी दिली. तर अमरावतीत आता त्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधीकारी शैलेश नवाल यांच्या समवेत जिल्हाचा कोरोना आढावा घेणार आहेत. तर दुपारी 4 वाजता यशोमती ठाकूर या बैठकीनंतर त्या पुन्हा पत्रकाराशी संवाद साधणार आहेत.

12 कंटेन्मेंट झोन घोषित

अमरावतीची परिस्थिती पाहाता अमरावती महानगरपालिकाने अमरावती शहरात 12 कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना 14 दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, असे आदेश प्रशासनाने दिला आहे. तर, या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. या 12 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला.

अमरावतीत 2,783 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

अमरावती मनपा हद्दीत सध्या 2,783 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असून अमरावती शहराला कोरोनाने पूर्णपणे विळखा घातला असल्याची माहिती मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. तर अमरावती जिल्ह्यात आज तब्बल 727 रुग्ण पॉझिटीव्ह आढळूण आले आहेत. आज 2,131 रुग्णांच्या टेस्ट झाल्या. जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर 34.11 टक्क्यांवर पोहोचला. आज एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे (Yashomati Thakur Gave Signs About Lockdown In Amaravati).

अचलपूर-परतवाडा सर्वात मोठा हॉट स्पॉट

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा सर्वात मोठा हॉट स्पॉट ठरला आहे. 359 रुग्ण घेत आहेत, अशी माहिती उपचार उपविभागीय अधीकार्‍यांनी दिली. अचलपूर परतवाडाच्या घरोघरी रुग्ण आढळत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा खळबळून कामाला लागली असून खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आली आहे.

Yashomati Thakur Gave Signs About Lockdown In Amaravati

संबंधित बातम्या :