नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर अखेर गुन्हा दाखल; कोरोनाचे नियम न पाळणे भोवले

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा(Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना कोरोनाचे नियम न पाळणं भोवलं आहे. (Corona Rules)

  • सुरेंद्रकुमार आकोडे, टीव्ही 9 मराठी, अमरावती
  • Published On - 11:29 AM, 21 Feb 2021
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर अखेर गुन्हा दाखल; कोरोनाचे नियम न पाळणे भोवले
नवनीत राणा, रवी राणा

अमरावती: खासदार नवनीत राणा(Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना कोरोनाचे नियम न पाळणं भोवलं आहे. अमरावती शहरात शिवजयंती कार्यक्रमात विनामास्क उपस्थित राहणे, तसेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा व कोरोनाचे नियम पायदळी तूडवल्या प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ,आमदार रवी राणा यांच्या सह पंधरा कार्यकर्त्यांवर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परंतु, रवी राणा आणि नवनतीत बुलेट वर विनामास्क सवारी केल्या प्रकरणी मात्र पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नसल्याच समोर आलं आहे. त्यामुळे दुचाकीवर प्रवास करताना करताना मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणारे पोलीस राणा दाम्पत्यावरही तशीच कारवाई केव्हा करणार असा प्रश्न उपस्थित झाला. (Police register case against Navneet Rana and Ravi Rana for violation of corona rules)

विनामास्क हेल्मेट विमा मास्क प्रवास

शुक्रवारी शिवजयंतीच्या कार्यक्रम निमित्ताने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्याचे पती आमदार रवी राणा हे दोघेही बुलेटने शिवजयंतीच्या कार्यक्रमसाठी गेले होते. सध्या कोरोनामुळे प्रत्येकाला मास्क लावणे बंधनकारक असल्याने दुचाकीवरून प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक आहे.मात्र, राणा दाम्पत्याने मास्क न लावता दुचाकीने प्रवास केला होता.त्यानंतर त्यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. तेव्हाही त्यांनी मास्क लावलेला नव्हता किंवा सोशल डिस्टनसिंगचं या कार्यक्रमात पालन झालं नव्हतं. पोलिसांनी अखेर राणा दाम्पत्यासह पंधरा कार्यकर्त्यांवर अमरावतीच्या फ़्रेजरपुरा पोलीस ठाण्यात कोरोना नियमांचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अमरावतीत लॉकडाऊन

अमरावतीमध्ये आज लॉकडाऊन असल्याने जागो जागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे. विनाकारण काही लोकं काम नसताना देखील घराच्या बाहेर निघत असल्याने पोलीस त्यांच्यावर कारवाई करत आहेत. एकंदरीत अत्यंत गरजेचं काम असलं तरच घराबाहेर निघावं, असे स्थानिक प्रशासनाचे आदेश आहेत. मात्र, तरीदेखील काम नसताना अमरावतीकर बाहेर निघत असल्याने त्यांना पोलीस कारवाईचा सामना करावा लागत आहे.

अमरावतीमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे बस सेवा देखील बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होतं आहे. अमरावती हे विभागाचे ठिकाण असून या ठिकाणी नागपूर, यवतमाळ, वाशीम,बुलडाणा, औरंगाबाद सह इतर जिल्हात बस सेवा सुरू राहतात. मात्र, इतर जिल्ह्यातील एसटी सेवा बंद असल्याने ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.लॉकडाऊन असल्याने बस सेवा बंद आहे. त्यामुळे या प्रवाशांना आजची रात्र बसस्थानकावर काढावी लागणार आहे


संबंधित बातम्या:

दिल्ली-मुंबईत मार्च-एप्रिलनंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद; देशात कोरोनाला ब्रेक

महाराष्ट्रातल्या ह्या 11 शहरांवर लॉकडाऊनचं संकट? कोरोना वाढतोय, यंत्रणा अलर्टवर!

(Police register case against Navneet Rana and Ravi Rana for violation of corona rules)