Amravati Legislative Council Election Results : अमरावती शिक्षक मतदारसंघातून महायुतीची मुसंडी; मविआला धक्का

23 ऑक्टोबर रोजी राज्यातील पाच विधान परिषद जागांसाठी निवडणूक पार पडली होती. आज मतमोजणी सुरू आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे.

Amravati Legislative Council Election Results : अमरावती शिक्षक मतदारसंघातून महायुतीची मुसंडी; मविआला धक्का
amravati legislative council election
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 27, 2026 | 4:33 PM

23 ऑक्टोबर रोजी राज्यातील पाच विधान परिषद जागांसाठी निवडणूक पार पडली होती. यामध्ये दोन शिक्षक मतदारसंघ ज्यामध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. तर तीन पदवीधर मतदारसंघ ज्यामध्ये पुणे पदवीधर मतदारसंघ, नागपूर पदवीधर मतदारसंघ आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघ यांचा समावेश आहे. आज या पाचही जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. आता अमरावती शिक्षक मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार आघाडीवर आहे.

अमरावती शिक्षक मतदार संघात मतमोजणीला सुरुवात झाली आहे.  पहिल्या फेरीतील 14 हजार मतपत्रिकांपैकी 8 हजार मतांची मोजणी आतापर्यंत झाली आहे.  मतमोजणीच्या पहिल्या फेरीत मोठ्या फरकाने महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक हे आघाडीवर आहेत. या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांच्यामध्ये मुख्य लढत आहे. दरम्यान शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे हे देखील या मतदारसंघातून चांगली लढत देत असल्याचं पहायला मिळत आहे . मात्र पहिल्या फेरीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक यांनी आघाडी घेतली आहे. परंतु ही मतमोजणीची पहिलीच फेरी असल्यामुळे अजून मतदारांचा कौल पुरेसा स्पष्ट झालेला नाहीये. या मतदारसंघातून नेमकी कोण बाजी मारणार? याबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading...

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात काय चित्र? 

दरम्यान आज मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या जागेसाठी देखील मतमोजणी होत आहे. हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला आला आहे, या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनीच निवडणूक लढवली तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रतापसिंह पाटील यांनी निवडणूक लढवली. या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीमध्ये कांटेकी टक्कर पहायला मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार या मतदारसंघातून सतीश चव्हाण यांनी आघाडी घेतली आहे. तर प्रतापसिंह पाटील हे पिछाडीवर आहेत. अद्याप निकाल हाती येणं बाकी आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us