कुपोषणचा प्रश्न गंभीर! 150 दिवसांत तब्बल 110 चिमुकल्यांचा मृत्यू, एकट्या ऑगस्ट महिन्यात ‘इतके’ बळी

Malnutrition in Maharashtra : ऑगस्ट महिन्यातील चिमुकल्यांच्या मृत्यूची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यातील 19 बालकांचा मृत्यू धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात झाल्याचं समोर आलंय.

कुपोषणचा प्रश्न गंभीर! 150 दिवसांत तब्बल 110 चिमुकल्यांचा मृत्यू, एकट्या ऑगस्ट महिन्यात 'इतके' बळी
धक्कादायक आकडेवारीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 10:48 AM

सुरेंद्रकुमार आकोडे, प्रतिनिधी, अमरावती : गेल्या अनेक वर्षांपासून अमरावतीच्या मेळघाटमध्ये (Melghat Malnutrition) कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. आता समोर आलेल्या आकडेवारीने या प्रश्नाची दाहकता पुन्हा एकदा अधोरेखित केलीय. गेल्या 5 महिन्यात तब्बल 110 चिमुकल्यांचा मेळघाटमध्ये मृत्यू झालाय. तर एकट्या ऑगस्ट (August 2022) महिन्यात 36 बालकं दगावलीत. कुपोषणासह विविध आजारांमुळे या मुलांचा मृत्यू (Children Death) झालाय.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात दोन मातांसह 0-6 वर्ष वयोगटातील 77 आणि 33 उपजत अशा 110 बालकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पाच महिन्यात 2525 बाळांचा जन्म मेळघाटमध्ये झाला. त्यापेकी 36 बाळांचा मृत्यू एकट्या ऑगस्ट महिन्यात झाल्यानं चिंता व्यक्त केली जातेय.

पाहा ताज्या घडामोडी : Video

हे सुद्धा वाचा

ऑगस्ट महिन्यातील चिमुकल्यांच्या मृत्यूची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यातील 19 बालकांचा मृत्यू धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आदिवासी बांधवांनी लहान मुलांना उपचार कुठे करायचे, असा प्रश्न निर्माण झालाय.

कुपोषणाच्या तीव्र श्रेणीमध्ये 232 बालकं आहेत. असं असताना 14 ब गट डॉक्टरांसाह कर्मचाऱ्यांची अनेक पदं रिक्त असल्यानंही संताप व्यक्त केला जातोय. तोकड्या आरोग्य यंत्रणेचा फटका चिमुकल्यांना बसतोय. ज्या चिमुकल्यांचा उपचारामुळे जीव वाचवणं शक्य आहे, अशांना योग्य वेळी आरोग्य सेवेची मदत न मिळाल्यानं त्यांनाही प्राण गमावावे लागत असल्याचं समोर आलेल्या आकडेवारीतून अधोरेखित झालंय.

मेळघाटातील आदिवासी बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतोय. राज्य आणि केंद्र सरकार विविध योजना आखतंय, न्यायालय ताशेरे ओढतंय, पण तरिही कुपोषित बालकांच्या मृत्यूची आकडेवारी कमी होत नसल्याचं वारंवार समोर आलंय. एप्रिल ते ऑगस्ट महिन्याच्या 150 दिवसात एकूण 110 मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू ऑगस्ट महिन्यात झाल्यानं सवालही उपस्थित केले जातायत. पावसाळ्यात साथीचे रोग आणि जलजन्य रोगांचा प्रादुर्भावामुळे ही आकडेवारी वाढली असण्याचा अंदाजही तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.