दापोलीच्या साई रिसॉर्टच्या वादात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री; मुंबई उच्च न्यायालयात याचिका

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान विभागानं (एमओइएफसीसी) दापोलीतील साई रिसॉर्ट्स एनएक्सच्या मालकांना कारणे दाखवा नोटीसी बजावली आहे. या नोटीस विरोधात साई रिसॉर्टचे मालक सदानंद गंगाराम कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दापोलीच्या साई रिसॉर्टच्या वादात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री; मुंबई उच्च न्यायालयात याचिका
वनिता कांबळे

|

Sep 22, 2022 | 11:46 PM

मुंबई : शिवसेना नेते, माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टवर( Sai Resort) नवरात्रोत्सवात तोडक कारवाई सुरू होईल. दिवाळी पर्यंत हा रिसॉर्ट जमीनदोस्त होईल असा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आता या वादात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. साई रिसॉर्टचे मालक सदानंद गंगाराम कदम( Sadanand Gangaram Kadam ) यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मला बाजू मांडण्याची संधी द्यावी अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान विभागानं (एमओइएफसीसी) दापोलीतील साई रिसॉर्ट्स एनएक्सच्या मालकांना कारणे दाखवा नोटीसी बजावली आहे. या नोटीस विरोधात साई रिसॉर्टचे मालक सदानंद गंगाराम कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

ज्यात या रिसॉर्टवर कारवाई का करू नये? अशी विचारणा या नोटीसच्या माध्यमातून करण्यात आली आहे. इतकचं नव्हे तर पर्यावरणाचं नुकसान केल्याबद्दल 25 लाखांच दंडही आकारण्यात आला आहे.  या नोटीस विरोधात कदम यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

राजकीय पुढा-यांच्या वादात मला नाहक नोटीसा का? असा सवाल गंगाराम कदम यांनी याचिकेच्या माध्यमातून केला आहे. त्याचबरोबर या सर्व वादात मला बाजू मांडण्याची संधी दिली नाही असा आरोप त्यांनी केला आहे.

हे वादग्रस्त आणि बेकायदेशीर रिसॉर्ट हे आधी राज्याचे माजी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या मालकीचं असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे

गुरुवारी सोमय्या दापोली दौऱ्यावर होते. परब यांचा दापोली येथील रिसॉर्ट नवरात्रीत तोडण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.

शुक्रवारी या रिसॉर्ट संदर्भात राष्ट्रीय हरित लवादासमोर सुनावणी होणार असून यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी, म्हणून मी दापोली येथे जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.

आता पर्यावरण मंत्रालयाकडे ही फाईल गेली आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले जाणार असल्याचे सोमय्यांनी सांगितले. पुढच्या आठवड्यात रत्नागिरी जिल्हाधिकारी हे त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.

रिसॉर्ट पडणार आणि या रिसॉर्टसाठी लावलेले पैसे कोठून आले याची देखील तपासणी होणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.

दापोली रिसॉर्टशी माझा काहीही संबंध नसून चुकीचे आरोप करण्यात आल्याचा दावा शिवसेना नेते अनिल परब यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें