Amaravati : राजस्थानातून तेलंगणाकडे जाणारे 58 उंट अमरावती पोलिसांच्या ताब्यात; खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकाराने कारवाई

| Updated on: Jan 11, 2022 | 10:15 PM

तळेगाव येथून पायदळ हे उंट निघाले असून ते अमरावती येथील दस्तुरनगरच्या गौरक्षणात नेण्यात येत असून हा 50 किलोमीटरचा प्रवास असणार आहे तर न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत 58 उंटाची देखरेख करण्याची जबाबदारी पोलिसांवर आली आहे.

Amaravati : राजस्थानातून तेलंगणाकडे जाणारे 58 उंट अमरावती पोलिसांच्या ताब्यात; खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकाराने कारवाई
राजस्थानातून तेलंगणाकडे जाणारे 58 उंट अमरावती पोलिसांच्या ताब्यात
Follow us on

अमरावती : राज्यस्थानहून हैदराबादच्या दिशेने निघालेल्या 58 उंटाची तस्करी होत असल्याची तक्रार हैदराबाद येथील प्राणीमित्राने केली होती. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून जात असलेले 58 उंट तक्रारीवरुन ताब्यात घेतले आहेत. प्राण्यांना इतकी मोठी चाल देणे सोबतच निर्दयी वागणूक देणे म्हणजे निर्दयीपणाचा कळस गाठणे व कत्तलीसाठी तस्करीचा आरोप प्राणीमित्र जसराज श्रीमाळ यांनी तक्रारीत केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या संदर्भात गुन्हे दाखल केले आहे.

न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत 58 उंटाची देखरेखीची जबाबदारी पोलिसांवर

सध्या या 58 उंटांना चक्क पोलीस संरक्षणात अमरावती येथील संरक्षणात पायदळ नेण्यात येत आहे. तर या उंटासाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तळेगाव येथून पायदळ हे उंट निघाले असून ते अमरावती येथील दस्तुरनगरच्या गौरक्षणात नेण्यात येत असून हा 50 किलोमीटरचा प्रवास असणार आहे तर न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत 58 उंटाची देखरेख करण्याची जबाबदारी पोलिसांवर आली आहे.

उंटांच्या देखभालीसाठी पुढे येण्याचे नवनीत राणांचे राजस्थानी लोकांना आवाहन

राज्यस्थानहून हैदराबादच्या दिशेने निघालेले 58 उंट अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिसांनी पकडले. हे उंट राज्यस्थानमधून 1200 किलोमीटर पायदळ हैदराबादमध्ये कत्तलीसाठी जात असल्याची खळबळजनक माहिती अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिली. तर देशात आता उंट तस्करीच मोठं रॅकेट या निमित्ताने उघडकीस येऊ शकतं असंही त्या म्हणाल्या. सदर 58 उंट हे अमरावती शहरातील दस्तुरनगर येथील गौररक्षणात ठेवण्यात आले असून याची पाहणी नवनीत राणा यांनी गौरक्षणात जाऊन केली. हे ऊंट आपल्या प्रदेशात राहू शकत नाही त्यामुळे राजस्थानमधील लोकांनी पुढाकार घेऊन यांची देखभाल करण्यासाठी आम्हाला लिहून द्यावे त्यानंतर विचार करून त्यांना सुपूर्द करण्यात येईल. त्यासाठी त्यांनी गोरक्षकांसोबत संपर्क साधावा असे आवाहनही खासदार नवनीत राणा यांनी केले आहे. (Amravati police arrest 58 camels traveling from Rajasthan to Telangana)

इतर बातम्या

‘आई आता आपण काय करायचं गं?’ अपघातात दगावलेल्या सलीलच्या मुलाचा सवाल, कुटुंब संकटात!

Wife Swapping Racket | ‘तुम्ही दोघं आधी टेलिग्राम ग्रूपमध्ये ऍड व्हा, मग स्वॅपिंगसाठी…’ पोलिसांनी सांगितली मोड्स ओपरेंडी