गुरुदेव वैद्यकीय रुग्णालयासमोर भीषण अपघात, ट्रकने दोन एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना चिरडले

| Updated on: Sep 24, 2022 | 2:31 PM

दोन्ही विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी झाली होती. काही वेळ वाहतूक खोळंबली होती.

गुरुदेव वैद्यकीय रुग्णालयासमोर भीषण अपघात, ट्रकने दोन एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना चिरडले
मोझरीत ट्रकची दुचाकीला धडक
Image Credit source: t v 9
Follow us on

स्वप्निल उमप, टीव्ही ९, अमरावती : अमरावती -नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गुरुकुंज मोझरीमध्ये भीषण अपघात झाला. ट्रक आणि दुचाकीचा हा भीषण अपघात आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडला. या भीषण अपघात वैद्यकीय महाविद्यालयाचे (Medical Colleges) दोन विद्यार्थी ट्रक खाली आल्याने गंभीर झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, विद्यार्थ्यांची (Student) दुचाकी अक्षरशः चकनाचूर झाली. या अपघातात जखमी झालेला विद्यार्थी सुमारे अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ ट्रकच्या समोरील चेचीसमध्ये अडकून पडला होता.

काही वेळ वाहतूक खोळंबली

दोन्ही विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी झाली होती. काही वेळ वाहतूक खोळंबली होती. ट्रक अमरावतीवरून नागपूरकडे जात होता. ट्रक दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा नादात हा अपघात झाल्याचे सांगितलं जातं.

ट्रक थेट किराणा दुकानात शिरला

याच वेळी श्री गुरुदेव वैद्यकीय रुग्णालयात व महाविद्यालयाच्या गेटमधून विद्यार्थी बाहेर पडत होते. थेट ट्रकखाली आले. यावेळी ट्रक थेट किराणा दुकानाजवळ शिरला. दुचाकीचा समोरील भाग चकनाचूर झाला. ट्रकवर नियंत्रण करता न आल्यानं ट्रक सरळ एका किराणा दुकानाजवळ जाऊन थांबला.

ट्रकला ओव्हरटॅक करताना अपघात

अपघातानंतर विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली. दुसऱ्या ट्रकला ओव्हरटॅक करताना अपघात झाला. हे विद्यार्थी तृतीय वर्षाचे शिक्षण घेत होते. भावेश जगनाडे व वैष्णवी नलरावार अशी जखमींची नावं आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमा झाले होते.