Video Yashomati Thakur : एक रुपयाही घेत नाही तुमच्याकडून, क्वालिटीचं काम करा, यशोमती ठाकूर यांनी अभियंत्यांना दिला सज्जड दम

| Updated on: Jul 25, 2022 | 5:41 PM

समोरच्या व्यक्तीकडं बोट दाखवून ठाकूर म्हणाल्या, एक रुपया घेत नाही मी तुमच्याकडून क्वालिटीचं काम दिसलं नाही तर डोकं फोडेन मी लक्षात ठेवा,

Video Yashomati Thakur : एक रुपयाही घेत नाही तुमच्याकडून, क्वालिटीचं काम करा, यशोमती ठाकूर यांनी अभियंत्यांना दिला सज्जड दम
यशोमती ठाकूर यांनी अभियंत्यांना दिला सज्जड दम
Follow us on

नागपूर : अमरावतीच्या माजी पालकमंत्री, आमदार यशोमती ठाकूर यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला. यशोमती ठाकूर म्हणाल्या, एक रुपयाही घेत नाही मी तुमच्याकडून क्वालिटीचं काम झालं नाही तर डोकं फोडेन, लक्षात ठेवा. पीडब्लूडीचे कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) उपस्थित होते. अमरावतीच्या तिवसा तालुक्यात रस्त्याचे भूमिपूजन करते वेळी अधिकाऱ्यांना दम दिला. तिवसा (Tivasa) तालुक्यात दहा लाख रुपये रस्त्याच्या कामासाठी मंजूर करून दिले. या कामाचे भूमिपूजन (Bhoomipujan) आज करण्यात आले. यावेळी गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सर्वांच्या समोरच यशोमती ठाकूर यांनी कनिष्ठ अभियंत्यास ठणकावून सांगितलं.

पाहा व्हिडीओ काय म्हणाल्या ठाकूर


सोशल मीडियावर प्रतिक्रिया

या कार्यक्रमाच्या भूमिपूजनाप्रसंगी अॅड. यशोमती ठाकूर यांनी विचारणा केली. याठिकाणी कोण-कोण जबाबदार व्यक्ती आहेत. त्यावर मी कनिष्ठ अभियंता पीडब्ल्यूडी, असं उत्तर मिळालं. समोरच्या व्यक्तीकडं बोट दाखवून ठाकूर म्हणाल्या, एक रुपया घेत नाही मी तुमच्याकडून क्वालिटीचं काम दिसलं नाही तर डोकं फोडेन मी लक्षात ठेवा, असा सज्जड दम दिला. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या. आनंदराव जाधव म्हणतात, सत्तेत होत्या तेव्हा हे असले चांगले सुचत नव्हतं. सत्ता गेली शहाणपण आलं वाटतं. असं असेल तर तुम्हीपण कायमस्वरुपी सत्तेत नसावं म्हणजे चांगली काम होतील. तर सचिन सूर्यवंशी म्हणतात, सत्ता गेल्यावर असं का सूचते बा!

हे सुद्धा वाचा

पोरांकडून म्हणून घेतला वारे पंजा…

अमरावती विशेष प्रकल्प विभागाअंतर्गत दहा लाख रुपयांचं काम मंजूर करण्यात आलं. जिल्हा विकास योजना 2021-22 अंतर्गत हे काम करण्यात आलं. तिवसा तालुक्यात भूमिपूजनाच्या कार्यक्रमात यशोमती ठाकूर पोहचल्या. यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यकर्त्यांसोबत यशोमती ठाकूर यांनी फोटोसेशन केलं. कुदळ मारून कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचं फेसबूक लाईव्हही ठाकूर यांनी केलं. यशोमती ठाकूर यांनी लहान मुलांना जवळ बोलावलं. त्यानंतर वारे पंजा असं म्हणायला लावलं. पण, पोरांचा आवाज काही निघत नव्हता. एका कार्यकर्त्यानं जोरानं वारे पंजा म्हटलं. त्यानंतर मुलांचाही आवाज वाढला. त्यानंतर मुलांना ठाकूर यांनी खाऊ दिला. बच्चेकंपनी खूश झाली.