Amravati Shiv Sena | राणांचे हनुमान चालीसा वाचन स्थगित, अमरावतीत फटाके फोडून शिवसैनिक परतले

| Updated on: Apr 23, 2022 | 6:02 PM

तिकडं राणा दाम्पत्यानं हनुमान चालीसा म्हणणं स्थगित केल्याचं जाहीर केलं. त्यानंतर अमरावतीत शिवसैनिकांनी आनंद साजरा केला. महिलांनी फुगडी खेळून आनंद साजरा केला. काही शिवसैनिकांनी फटाके फोडले. राणा दाम्पत्यानं अखेर माघार घेतल्याचा हा आनंद होता.

Amravati Shiv Sena | राणांचे हनुमान चालीसा वाचन स्थगित, अमरावतीत फटाके फोडून शिवसैनिक परतले
अमरावतीत शिवसैनिकांनी आनंद साजरा केला
Follow us on

अमरावती : आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा (Ravi Rana) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माघार घेतली आहे. तर दुसरीकडे अमरावतीमध्ये शिवसैनिकांनी रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानासमोर फटाके फोडत जल्लोषदेखील केला. शिवसैनिक राजापेठमधील (Rajapeth) राणा यांच्या घरासमोर धडकले. ते पळून मुंबईला गेल्याचा आरोप शिवसैनिकांनी लावला. राणा दाम्पत्य राजकीय स्टंट करत असल्याचं ते म्हणाले. रवी राणा यांनी मुंबईतून आमची मुलं अमरावतीत आहेत. त्याठिकाणी शिवसैनिकांनी दगडफेक केली असल्याचा आरोप केला. पण, त्या आरोपात काही तत्थ नसल्याचं समोर आलं. आम्ही कोणत्याही प्रकारची दगडफेक केली नाही, असं स्पष्टीकरण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलं.

अमरावतीत राणांच्या घरासमोर शिवसैनिक आक्रमक

याठिकाणी शिवसैनिक फक्त घोषणाबाजी करत होते. आमच्यावर चुकीचा आरोप केला गेला. या कारणावरून अमरावतीतील शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडून राणांच्या निवासस्थानी मोर्चा वळविला. पण, अमरावतीत पोलीस बंदोबस्त असल्यामुळं शिवसैनिकांना अडविण्यात आलं. सकाळ सकाळपासूनच तणावपूर्ण वातावरण होते. अमरावती येथील घरासमोर तीन तासांपूर्वी शिवसैनिक राहिले. दोन-अडीचशे कार्यकर्त्यांनी राणांच्या घराला वेढा दिला. पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडण्यात आले. सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार, अशी घोषणा राणा दाम्पत्यानं केली होती.

अमरावतीत फोडले फटाके

काल राणांचे कार्यकर्ते मुंबईसाठी निघणार होते. पण, रवी राणा यांनी आवाहन केल्यामुळं कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना झाले नव्हते. अमरावतीचे शिवसैनिक आक्रमक झाले. तिकडं राणा दाम्पत्यानं हनुमान चालीसा म्हणणं स्थगित केल्याचं जाहीर केलं. त्यानंतर अमरावतीत शिवसैनिकांनी आनंद साजरा केला. महिलांनी फुगडी खेळून आनंद साजरा केला. काही शिवसैनिकांनी फटाके फोडले. राणा दाम्पत्यानं अखेर माघार घेतल्याचा हा आनंद होता.

Amravati Shiv Sainik | रवी राणांचा घरावर दगडफेक केल्याचा आरोप; अमरावतीत शिवसैनिक आक्रमक

Navneet Rana | शिवसेनेविरोधात दोन हात करणाऱ्या कोण आहेत नवनीत राणा? मॉडलिंग ते राजकारणातील नवनीत यांचा प्रवास

Amravati Shiv Sena | अमरावतीतील राणांच्या घरासमोर शिवसेनेचे कार्यकर्ते धडकले, राणांचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने