राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारची सर्वात मोठी घोषणा, महत्त्वाचा निर्णय, मिळणार मोठा दिलासा

राज्यात यंदा एल निनोमुळे पावसाने दडी मारली, मान्सूनच्या पावसात मोठी तूट झाल्याने महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता सरकारने एक मोठी घोषणा केली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारची सर्वात मोठी घोषणा, महत्त्वाचा निर्णय, मिळणार मोठा दिलासा
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 30, 2026 | 5:26 PM

राज्यात यंदा एल निनोमुळे पावसाने दडी मारली, मान्सूनच्या पावसात मोठी तूट झाल्याने महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे. ऐन खरीप हंगामात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. निदान रब्बी हंगामासाठी तरी पाऊस होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र शेतकऱ्यांच्या या आशेवर देखील पाणी फिरलं आहे. यंदा खरीप तर नाहीच परंतु रब्बी हंगाम देखील हातचा गेला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. दरम्यान राज्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळांतर्गत करण्यात येणाऱ्या उपाय योजना देखील सुरू असून, आता राज्य सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दुष्काळग्रस्तांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जनावरांच्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी सुका चारा व मुरघास खरेदीचे दर निश्चित करण्यात आले आहेत.  दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे.  सुका चारा 12 रूपये, तर मुरघास 8 रुपये प्रति किलो दराने खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.  आंबट, कुबट वास नसलेला चारा खरेदी करा, चाऱ्यासाठी ज्वारी व बाजरी खरेदीस प्राधान्य द्या,  बुरशी, माती व कीड न लागलेला चारा खरेदी करा. अशा सूचना देखील यावेळी बावनकुळे यांनी  प्रशासनाला दिल्या आहेत. दरम्यान  वाहतूक खर्चासाठी स्वतंत्र निधी देण्यात येणार आहे.

Loading...

तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विविध योजना देखील सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना मदत म्हणून याच आठवड्यात पाच हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इतरही सवलीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बँकेच्या कर्ज वसुलीला देखील स्थगिती देण्यात आली आहे. त्यानंतर आता पशुमालकांना चारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. खरेदीचे दर निश्चित करण्यात आले आहेत.  यामुळे पाळीव प्राण्यांच्या चाऱ्याची सोय होणार असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुका चारा 12 रूपये, तर मुरघास 8 रुपये प्रति किलो दराने खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us