AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ना घर, ना मंदिर… चक्क विमानात परिणीतीचा करवा चौथ ! राघवसोबतचे खास क्षण व्हायरल

KarwaChauth Celebration : बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि भाजपा नेता राघव चड्ढा यांनी यंदाचं करवा चौथ विमानंत साजरं केलं. दोघांनी तिथेच सगळ्या रीति-परंपरा पूर्ण केल्या.

Video : ना घर, ना मंदिर... चक्क विमानात परिणीतीचा करवा चौथ ! राघवसोबतचे खास क्षण व्हायरल
| Updated on: Oct 30, 2026 | 5:08 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि तिचे पती, खासदार राघव चड्ढा यांनी यंदाचा करवा चौथ अतिशय खास आणि रोमँटिक अंदाजात साजरा केला. मात्र, यावेळी त्यांच्या सेलिब्रेशनमध्ये एक अनोखी गोष्ट घडली. फ्लाइटला उशीर झाल्यामुळे दोघांनाही वेळेवर घरी पोहोचता आलं नाही. त्यामुळे त्यांनी चक्क 35 हजार फूट उंचीवर उडत्या विमानातच करवा चौथचे विधी पूर्ण केले. परिणीतीने राघवच्या हातून पाणी पिऊन आपला उपवास सोडला. या खास क्षणाचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या चर्चेत आहे.

परिणीतीने शेअर केला खास VIDEO

परिणीती चोप्राने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर करवा चौथ सेलिब्रेशनचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आणि राघव विमानात करवा चौथ साजरा करताना दिसत आहेत. परिणितीने आधी चंद्राचं दर्शन घेतलं, त्याला नमस्कार केला आणि त्यानंतर राघवच्या हातून पाणी पिऊन आपला उपवास सोडला. विमानातील हा रोमँटिक क्षण चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

‘तू माझी सगळी स्वप्नं पूर्ण केलीस’

हा व्हिडिओ शेअर करत परिणीतीने पती राघव चड्ढासाठी एक खास प्रेमळ संदेशही लिहिला. तिने म्हटलं, “आपण कुठेही असलो तरी करवा चौथ तिथेच असतो… अगदी 35 हजार फूट उंचीवर असलो तरी ! राघव, तू माझी सगळी स्वप्नं पूर्ण केलीस. तू सर्वांत उत्तम, सर्वांत छान आणि सर्वांत गोड माणूस आहेस.”

यासोबतच परिणीतीने स्पष्ट केलं की, विमानात करवा चौथ साजरा करण्याचा त्यांचा आधीपासून कोणताही प्लॅन नव्हता. मात्र, फ्लाइटला उशीर झाल्यामुळे त्यांना विमानातच उपवास सोडावा लागला. त्यामुळे यंदाचा करवा चौथ दोघांसाठी कायम लक्षात राहणारा ठरला.

पावसामुळे अनेक ठिकाणी चंद्रदर्शनात अडथळा

यंदा 29 ऑक्टोबर 2026 रोजी करवा चौथचा सण साजरा करण्यात आला. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर निर्जळी उपवास करतात आणि रात्री चंद्रदर्शनानंतर उपवास सोडतात. मात्र, दिल्ली-एनसीआर, मेरठ, नीमच आणि अलवरसह काही भागांत पाऊस आणि दाट ढगांमुळे चंद्रदर्शनात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे काही महिलांनी मोबाईलवर चंद्राचं दर्शन घेऊन उपवास सोडल्याचं समोर आलं.

परिणीती चोप्राव्यतिरिक्त प्रियांका चोप्रा, शिल्पा शेट्टी, सोनम कपूर आणि मीरा राजपूत यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही यंदा करवा चौथचा सण उत्साहात साजरा केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेता अनिल कपूर यांच्या घरी खास करवा चौथ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात आमिर खान आणि त्यांची पत्नी गौरी स्प्रॅट यांनीही हजेरी लावली. लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा करण्यासाठी ते या सोहळ्यात सहभागी झाले होते. याशिवाय शिल्पा शेट्टी, सोनम कपूर, मीरा राजपूत, रिद्धिमा कपूर साहनी, महीप कपूर, भावना पांडे, नीलम कोठारी, गीता बसरा, अंशुला कपूर, ताहिरा कश्यप, मिनी माथुर आणि फराह खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

Follow Us
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...