मोठी विहीर दुर्घटना! जिल्हाधिकाऱ्यांचे थेट चाैकशीचे आदेश, तब्बल 12 तास..
सोलापूरच्या पंढरपूरमध्ये धक्कादायक घटना घडली. ज्याने एकच खळबळ उडाली. थेट विहिरीचे काम सुरू असताना दगड कोसळल्याने थेट चार कामगार अडकून पडले. या घटनेची संपूर्ण चौकशी पालकमंत्र्यांच्या आदेशाने एक समिती स्थापन करून होणार आहे.

पंढरपूरमधील विहीर दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. याबाबतची घोषणा करण्यात आली. शोधकार्यात विहिरीतून बाहेर काढलेल्या दगडाची तपासणी करून ब्लास्टिंगमध्ये कुठले केमिकल वापरले याचाही उलगडा होणार आहे. पंढरपूरमध्ये मोठी दुर्घटना घडली. पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात दगडाचा ढिगारा कोसळून चार कामगार अडकल्याची घटना घडली. विहिरीचे काम सुरू असताना ही घटना घडली. जिल्ह्यातील परवानगी घेतलेल्या व न परवानगी घेतलेल्या विहिरींचे सर्वेक्षण करणार असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली. बारा तासाहून अधिक काळ जिल्हाधिकारी घटनास्थळावर तळ ठोकून बचाव कार्यात सहभागी झाले होते. पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात दगडाचा ढिगारा कोसळून चार कामगार अडकले होते.
या घटनेची संपूर्ण चौकशी पालकमंत्र्यांच्या आदेशाने एक समिती स्थापन करून होणार आहे. या शोधकार्यात विहिरीतून बाहेर काढलेल्या दगडांची तपासणी करून त्यावर असणाऱ्या केमिकलची ही तपासणी होणार असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी थेट याबाबतचे आदेशच दिले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतांमध्ये सुरू असलेल्या व परवानगी घेतलेल्या किंवा न घेतलेल्या विहिरींचे सर्वेक्षण करणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे विहीर दुर्घटनेनंतर सोलापूर जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणावर अलर्ट मोडवर आहे. या प्रकरणाची आता सखोल चाैकशी केली जाणार आहे. संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे पंढरपूर विहीर दुर्घटनेतील बचाव कार्य आणि शोधकार्यात सोलापूरचे जिल्हाधिकारी स्वतः बारा तासाहून अधिक काळ घटनास्थळावर तळ ठोकून होते.
त्यांनी स्वत: बचावकार्यात सहभाग देखील घेतला. 12 तासानंतर चौघांपैकी पहिल्या कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. दगडाच्या ढीगार्याखाली अडकलेला कामगाराला बाहेर काढल्यावर वैद्यकीय तपासणीनंतर मृत घोषित करण्यात आले. सिद्धू घाडगे या कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. NDRF कडून तिघांचा शोध सुरु असल्याची माहिती मिळतंय. विहिरीचे काम सुरू असताना अचानक दगड पडल्याने ही घटना घडली. कामगारांना बाहेर येण्यासही वेळ मिळाला नाही.