मोठी बातमी! राज्यात ‘या’ महिलांच्या बँक खात्यात थेट 2000 रुपये पडणार; राज्य सरकारची मोठी घोषणा; दिवाळी गोड होणार!

राज्यातील गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी गोड व्हावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

मोठी बातमी! राज्यात या महिलांच्या बँक खात्यात थेट 2000 रुपये पडणार; राज्य सरकारची मोठी घोषणा; दिवाळी गोड होणार!
anganwadi sevika to get 200 rupees
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 14, 2026 | 5:12 PM

Anganwadi Mahila Help : राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

दोन हजार रुपये भाऊबीज भेट

राज्यात १,०८,६२७ अंगणवाडी सेविका आणि १,०५,४७० अंगणवाडी मदतनीस अशी एकूण २,१४,०९७ पदे कार्यरत आहेत. या सर्व कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Loading...

दिवाळी गोड व्हावी म्हणून निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी गोड व्हावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

लडक्या बहिणींना नेमके कधी मिळणार पैसे?

दरम्यान, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी गोड होणार असल्याचे सांगितले असले तरी राज्यातील लाडक्या बहिणींना पैसे नेमके कधी मिळणार? असे विचारले जात आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यात आला होता. आता ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये अद्याप बाकी आहेत. त्यामुळे हे पैसे नेमके कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढच्या महिन्यात दिवाळी आहे. त्यामुळे सरकार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे पैसे एकदाच देणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. सरकारने असा काही निर्णय घेतलाच तर लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यात एकदाच 3000 रुपये मिळू शकतात. दरम्यान, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसून लाडक्य बहिणींनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us