कोरोनाने दगावलेल्या एसटीच्या 200 पैकी 11 कर्मचाऱ्यांनाच अर्थसहाय्य, इतरांसाठी अनिल परबांची सरकारकडे धाव

| Updated on: May 07, 2021 | 9:10 PM

गेल्या दीड वर्षांमध्ये कोरोना संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाकडून 20 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी आग्रही मागणी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी केलीय.

कोरोनाने दगावलेल्या एसटीच्या 200 पैकी 11 कर्मचाऱ्यांनाच अर्थसहाय्य, इतरांसाठी अनिल परबांची सरकारकडे धाव
Anil Parab
Follow us on

मुंबई : गेल्या दीड वर्षांमध्ये कोरोना संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाकडून 20 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी आग्रही मागणी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी केलीय. याबाबत त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे मागणी केलीय (Anil Parab demand 50 lakh financial help to ST workers who died during Corona lockdown).

महामारीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचं महत्त्वाचं योगदान

मार्च 2020 पासून कोरोना महामारीच्या काळात शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक, लाखो परप्रांतीय मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन सुखरूप पोहचवणे, हजारो विद्यार्थ्यांना परराज्यातून त्यांना सुखरूप घरी घेऊन येणे, हजारो ऊस तोडणी मजुरांना कारखान्यापासून त्यांच्या घरापर्यंत घेऊन जाणे, अत्यावश्यक व कृषिजन्य मालाची वाहतूक करणे, वैद्यकीय ऑक्सिजन आणण्यासाठी टँकरला चालक पुरविणे, शासकीय रुग्णवाहिकांना चालक पुरविणे अशा अनेक कामामध्ये धोका पत्करून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आपली सेवा बजावलेली आहे.

“200 पैकी सरकारने केवळ 11 कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच 50 लाख रुपयांची मदत

कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, परिचारिका, पोलीस या सारख्या कोरोना योद्ध्यांच्या खांद्याला खांदा लावून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी देखील शर्तीचे प्रयत्न केले. दुर्दैवाने या काळात 200 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच हजारो कर्मचारी कोरोनावर उपचार घेत आहेत. मात्र, या 200 पैकी सरकारने केवळ 11 कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच 50 लाख रुपयांची मदत केली. ही मदत महामंडळाच्या आर्थिक निधीतून करण्यात आली.

“महामंडळाच्या आर्थिक अडचणीमुळे मदत करणं शक्य होत नाही”

यावर सरकारने म्हटलं आहे, “एसटी महामंडळाने शासनाच्या निर्देशानुसार नियम व अटी शर्थीच्या अधीन राहून मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांना मदत केलीय. त्यामुळे इच्छा असूनही 200 पैकी 11 कर्मचाऱ्यांना मदत केली. दुर्दैवाने इतर मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करण्याची इच्छा असून देखील महामंडळाच्या आर्थिक अडचणीमुळे मदत करणं शक्य होत नाही.”

“एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना योद्ध्याचा दर्जा देऊन वारसांना 50 लाखांची मदत करा”

“आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना योद्ध्याचा दर्जा देऊन शासनाकडून 50 लाख रुपयांची त्यांच्या वारसांना मदत करण्यात यावी,” अशी आग्रही मागणी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली.

हेही वाचा :

लसीकरण केंद्राचं उद्घाटन हा वार्डाचा कार्यक्रम, विधानसभेचा नाही, झिशान सिद्दीकींच्या नाराजीवर परबांचं उत्तर

वांद्रे पूर्वेतील लसीकरण केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात डावललं, काँग्रेस आमदार नाराज

अनिल देशमुखांप्रमाणेच अनिल परब आणि संजय राऊतांचीही चौकशी करा : चंद्रकांत पाटील

व्हिडीओ पाहा :

Anil Parab demand 50 lakh financial help to ST workers who died during Corona lockdown