
“उद्या दाऊदच्या विरोधात कोर्टात कुणी आलं नाही. तो दोषमुक्त झाला तर त्याला तुम्ही गुंड समजणार नाही का? सचिनचा भाऊ नामचीन गुंड आहे. त्याची पार्श्वभूमीही गुन्हेगारीची आहे. पोलीसांनी अर्ज नाकारला. पोलीस काय मूर्ख आहे का? योगेश कदम यांनी किती परवाने दिले. याची माहिती घेणार आहे. माझी नोटीस तयार होत आहे. त्यांना नोटीस पाठवणार आहे. माफी मागितली नाही तर मी त्यांना कोर्टात खेचणार आहे” असा इशारा अनिल परब यांनी दिला.
“एकदा जज म्हणून तुम्ही त्या खुर्चीत बसल्यावर तुम्ही योगेश कदम मूर्ख म्हणून आदेश काढत नाहीत. तो अर्ध न्यायिक जज म्हणून आदेश काढतो. योगेश कदमला कोण विचारत नाही. त्याला काय समजतं ? पण तुम्ही ज्या खुर्चीत बसला त्याचा अपमान करत आहात. तुम्ही पोलिसांची बाजू ऐकली असेल ना. पोलिसांनी सांगितलं असेल ना. सचिन घायवळवर चापटी मारल्याचे गुन्हे नाहीत. आमच्यावर गुन्हे आहेत. ते आंदोलन आणि सामाजिक चळवळीचे गुन्हे आहेत. हे गुन्हे त्याच्यावर असते तर समजू शकतो. पण घायवळवर गंभीर गुन्हे आहेत. हे अर्थपूर्ण व्यवहार असेल किंवा भविष्यात तुला माझ्यासाठी काम करावे लागेल हा त्या मागचा हेतू असेल” असा दावा अनिल परब यांनी केला.
फोटो काढण्यावर मी बोलणार नाही
“माझा साधा प्रश्न आहे. फोटो काढण्यावर मी बोलणार नाही. कारण रस्त्यावर चालतानाही लोक फोटो काढतात. महत्त्वाचं काय. तर त्याच्या सोबतचे संबंध कसे आहेत. आर्थिक संबंध आहे. त्याच्याशी काही व्यवहार आहे का? कोणत्या गुन्ह्यात एकत्र होते का? असे प्रश्न अनिल परब यांनी विचारले.
‘तिथे हे दिवटे बसले आहेत’
“सचिन आणि निलेश घायवळ दोन्ही भाऊ एका खुनाच्या गुन्ह्यात एकत्र होते. असे गुन्हे त्यांच्यावर आहेत. त्यांना तुम्ही संरक्षण देता. आता तुमची सुटका होऊ शकत नाही. मी तर योगेश कदमचा राजीनामा मागतोय. त्यांनी किती शस्त्र परवाने दिले आहेत. अर्थपूर्ण व्यवहार किती झाले आहेत. याची माहिती घेतो. मुख्यमंत्र्यांचं काय कौतुक आहे, जिथे सुनावणी घेण्याचा अधिकार आहे, गृहराज्यमंत्री आणि महसूलला आहे. तिथे हे दिवटे बसले आहेत” अशी टीका अनिल परब यांनी केली.