नारायण राणे इंग्रजी प्रश्नावर राज्यसभेत गडबडले, अंजली दमानिया यांचा ट्विटरवर निशाणा

"इंग्रजी येत नसेल तर त्यांनी एखादा ट्यूटर ठेवावा किंवा कामकाजच हिंदीत चालू ठेवावं, अशी विनंती स्पिकरला करावी. आमचीही तीच मागणी आहे. कारण यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होते. महाराष्ट्राचे खासदार संसदेत जाऊन काय दिवे लावतात? हे संपूर्ण देश पाहतोय आणि हे फार निंदनीय आहे आणि हास्यास्पद आहे", अशी टीका अंजली दमानिया यांनी केली.

नारायण राणे इंग्रजी प्रश्नावर राज्यसभेत गडबडले, अंजली दमानिया यांचा ट्विटरवर निशाणा
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 4:35 PM

मुंबई | 6 फेब्रुवारी 2024 : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा राज्यसभेतला एक व्हिडीओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून ट्विट करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. “नारायण राणे यांना संसदेत प्रश्न विचारला गेला. MSME क्षेत्रात कामगार कल्याणासाठी काय पावलं उचलणार? हा प्रश्न होता. उत्तर काय दिलं ऐका…. ज्यांना प्रश्न देखील कळत नाही ते MSME ना काय दिशा आणि चालना देणार? नुसती दादागिरी चालत नाही राजकारणात. आणि बॉसचा वरदहस्त फार काळ चालत नाही”, अशा खोचक शब्दांत अंजली दमानिया यांनी टीका केली आहे. अंजली दमानिया यांनी नारायण राणे इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नावर राज्यसभेत गडबडल्याचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. कामागारांच्या प्रश्नासाठी काय पावलं उचलणार आहात? असा प्रश्न नारायण राणे यांना उद्देशून विचारण्यात आला. पण तो प्रश्न इंग्रजीत विचारण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला. त्यानंतर खासदार कार्तिकेय शर्मा यांनी त्यांना पुन्हा प्रश्न विचारला.

कार्तिकेय शर्मा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नारायण राणे बोलू लागले. पण त्यांना उपसभापतींनी रोखलं. “खूप पावलं उचलून या क्षेत्राला पुनर्जिवित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपली अनुमती असेल तर मी सगळं वाचून दाखवतो”, असं नारायण राणे म्हणाले. त्यावर राज्यसभेचे उपसभापती आपण थोडक्यात सांगा, असं म्हणाले. “एमएमएमईच्या क्षेत्रात निर्यातीला वाढवण्यासाठी प्रतिस्पर्धकताला वाढवण्यासाठी सरकारने मेक इन इंडिया कार्यक्रम अंतरर्गत व्यवसायाची सुगमता आणि संवर्धनासाठी…”, असं नारायण राणे म्हणत असताना राज्यसभेच्या उपसभापतींनी त्यांना रोखलं.

‘नाही नाही, तुम्ही थांबा, हे मी वाचून सांगतोय’

एमएसएमई क्षेत्रात कामगारांच्या कल्याणासाठी काय काम होतंय? असा प्रश्न असल्याचं उपसभापतींनी नारायण राणे यांना स्पष्ट केलं. त्यावर नारायण राणे यांनी उपसभापतींना पुन्हा प्रश्न काय होता ते विचारत प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यावर नारायण राणे बोलू लागले.

“नाही नाही तुम्ही थांबा. हे मी वाचून सांगतोय. हा मुद्दा देखील चालू झाल्याने कामगारांचं भलं होईल. कारखाना बंद राहिला तर कामगारांचं भलं होईल का?”, असा प्रश्न नारायण राणे उपस्थित करतात. पण उपसभापती पुन्हा नारायण राणे यांना प्रश्न समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. तसेच कामगारांच्या कल्याणासाठी काय काम होत आहे हे तुम्ही प्रश्न विचारणाऱ्या सदस्यांना बोलावून समजावून सांगावं, असं उपसभापती नारायण राणे यांना उद्देशून म्हणतात. याबाबतचा व्हिडीओ ट्वीट करत अंजली दमानिया यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला.

‘हे फार निंदनीय आहे आणि हास्यास्पद’

अंजली दमानिया यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राणेंवर निशाणा साधला. “नारायण राणे हे एमएसएमीचे मंत्री आहेत आणि एमएसएमई अंतर्गत साडेसहा लाख उद्योग येतात. त्याचे ते नेतृत्व करतात आणि त्यांची इंग्रजी पहा कशी आहे. त्यांना जर इंग्रजी येत नसेल तर त्यांनी एखादा ट्यूटर ठेवावा किंवा कामकाजच हिंदीत चालू ठेवावं अशी विनंती स्पिकरला करावी. आमचीही तीच मागणी आहे. कारण यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होते. महाराष्ट्राचे खासदार संसदेत जाऊन काय दिवे लावतात? हे संपूर्ण देश पाहतोय आणि हे फार निंदनीय आहे आणि हास्यास्पद आहे”, अशी टीका अंजली दमानिया यांनी केली.

“अशा पद्धतीने स्वतःचा हास्य करून घेणे योग्य नाही. आता नारायण राणे यांनी संसदेत हे दुसऱ्या वेळेस केलेलं आहे. यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राची मान शर्मन खाली गेली. नारायण राणे यांनी यासाठी राजीनामा द्यायला हवा. आमची मागणी की त्यांनी तातडीने एमएसएमईच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा. तेच काय पण त्यांचे जे पुत्र आहेत ते सुद्धा दादागिरी करतात. भाईगिरी करून हे राजकारणामध्ये आलेले आहेत आणि आमचा बॉस सागर बंगल्यावर बसतो असं छाती ठोकपणे हे सगळ्यांना सांगतात. त्यामुळे असं राजकारण महाराष्ट्र कधी पाहिलेलं नाहीये. याचा आम्ही निषेध करतो. अज्ञानी मंत्र्यांनी जास्त वेळ द्यायला हवा आणि एमएसईबी मंत्रालयामध्ये काम पाहायला हवं”, असं दमानिया म्हणाल्या,

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.