अण्णा हजारे रुग्णालयात दाखल, अॅन्जिओग्राफीसह डॉक्टरांकडून नियमित तपासणी

| Updated on: Nov 25, 2021 | 7:42 PM

अण्णा हजारे यांना नियमित तपासणीसाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना सध्या कुठलाही त्रास होत नाहीये. रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्यावर तपासण्या करण्यात आल्या आहेत. अण्णा हजारे दर तीन महिन्यांनी नियमित तपासणीसाठी रुग्णालयात जातात.

अण्णा हजारे रुग्णालयात दाखल, अॅन्जिओग्राफीसह डॉक्टरांकडून नियमित तपासणी
Anna hazare
Follow us on

मुंबई : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रकृतीसंदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. त्यांना पुण्यातील रबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यावर अॅन्जिओग्राफी करण्यात आली आहे. तसेच सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत असल्यामुळे उद्या (25 नोव्हेंबर) त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे.

नियमित तपासणीसाठी हजारे रुग्णालयात

अण्णा हजारे यांना नियमित तपासणीसाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना सध्या कुठलाही त्रास होत नाहीये. रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्यावर तपासण्या करण्यात आल्या आहेत. अण्णा हजारे दर तीन महिन्यांनी नियमित तपासणीसाठी रुग्णालयात जातात. मात्र कोरोना साथीमुळे मागील वर्षभरापासून त्यांनी नियमित तपासणी केली नव्हती. याच पार्श्वभूमीवर त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

डॉक्टरांनी अॅन्जिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला

मिळालेल्या माहितीनुसार हजारे यांचे वाढलेले वय पाहता खबरदारी म्हणून डॉक्टरांनी त्यांची अॅन्जिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना उद्या डिस्चार्ज मिळणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्याकडून हजारे यांची चौकशी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रकृतीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी केली. हजारे लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. सध्या मुख्यमंत्री ठाकरे एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरू आहे. मात्र आज अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर त्यांनी अण्णांच्या प्रकृतीला आराम मिळावा अशी भावना व्यक्त केली.

संबंधित बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, फिजीओथोरेपी व्यवस्थित सुरु असल्याची दिली माहिती

‘गृहपाठ न केल्यानं तोंडघशी पडावं लागलं’, एसटी कर्मचारी आंदोलनावरुन राजू शेटींचा सदाभाऊंना टोला