omicron alert | पिंपरीत नायजेरियाहून आलेल्या आणखी एकाला कोरोनाची लागण

आत्तापर्यंत नायजेरियाहुन आलेले 3 आणि त्यांच्या संपर्कातील 3 असे सहाजण पॉझिटिव्ह आलेले आहेत. या सर्वांचे नमुने हे ओमीक्रोन व्हेरिएन्ट तपासणीसाठी जिनोमिक सिक्वेसिंगसाठी करिता पाठविण्यात आलेले आहेत.

omicron alert | पिंपरीत नायजेरियाहून आलेल्या आणखी एकाला कोरोनाची लागण
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 4:23 PM

पिंपरी – पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरिया हून आलेल्या आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेले आणखी दोघे पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे आत्तापर्यंत नायजेरियाहुन आलेले 3 आणि त्यांच्या संपर्कातील 3 असे सहाजण पॉझिटिव्ह आलेले आहेत. या सर्वांचे नमुने हे ओमीक्रोन व्हेरिएन्ट तपासणीसाठी जिनोमिक सिक्वेसिंगसाठी करिता पाठविण्यात आलेले आहेत. तर दुसरीकडं पुण्यात परदेशातून आलेल्या 17 जणांची आरटीपीसी टेस्ट करण्यात आली होती. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे.

यापूर्वी तिघांना लागण
यापूर्वी आफ्रिकेतील नायजेरिया देशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या दोघे जण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या एक जण असे तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी कॅम्पातील नवीन जिजामाता रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना होम आयसोलेट करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली होती.   राज्य शासनाच्या सूचनेवरून परदेशामधून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.  नायजेरियातून दोघे जण गुरूवारी (दि.25) पिंपरी-चिंचवड शहरात आले. त्यांची कोरोना चाचणी केली असता सोमवार (दि.29) त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तसेच त्यांच्या संपर्कातील एका व्यक्तीचा अहवाल मंगळवार (दि.30) कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.  त्या तिघांना पालिकेच्या जिजामाता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे संपर्कामधील नागरिकांना होम आयसोलेट केले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

स्थानिक प्रशासनही सर्तक

पुणे शहरात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य शासनाबरोबरच स्थानिक प्रशासनानेही निर्बंध कडक केले आहेत. शहरात मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.. प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. सद्यस्थितीला पुणे जिल्ह्यात १३ लाख ९३ हजार ५९० नागरिकांचा डोस घेणे बाकी आहे. शहरात नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांमध्ये ५० टक्के आसनक्षमता तर खुल्या मैदानांमध्ये २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. मॉलमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना दोन डोस अनिवार्य करण्यात आले आहेत. नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळणे, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आदी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ऊस गाळप हंगाम मध्यावर, ऊसतोड कामगारांचा विकास मात्र कागदावरच

केंद्राविरोधात राज्याचा शड्डू, मंत्री देसाईंची घोषणा; मराठीच्या अभिजाततेसाठी जनतेच्या न्यायालयात लढा, राष्ट्रपतींकडे याचिका

Parambir singh : परमबीर सिंहांनी निलंबन धुडकावलं, ठाकरे सरकारविरोधात कोर्टात जाणार