Parambir singh : परमबीर सिंहांनी निलंबन धुडकावलं, ठाकरे सरकारविरोधात कोर्टात जाणार

निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. ठाकरे सरकारे सरकारने केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात परमबीर सिंह कोर्टातही जाणार आहेत.

Parambir singh : परमबीर सिंहांनी  निलंबन धुडकावलं,  ठाकरे सरकारविरोधात कोर्टात जाणार
परमबीर सिंह, अनिल देशमुख

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सध्या चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत, खडणीसारख्या गंभीर आरोपात परमबीर सिंह यांच्या चौकशी सुरू आहेत. त्यावरून सुरूवातीला त्यांचं निलंबनही करण्यात आलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंह नंतर स्वत: अडचणीत सापडले. परमबीर सिंह यांच्यावरही नंतर अनेक गंभीर आरोप झाले, त्यानंतर परबीर सिंह काही काळ फरार झाल्याचं दिसून आलं. मात्र सुप्रीम कोर्टानं अटकेपासून दिलासा दिल्यानंतर परमबीर सिंह पुन्हा मुंबईत आले.

ठाकरे सरकारविरोधात कोर्टात जाणार

सचिन वाझेचं प्रकरण बाहेर आल्यानंतर परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या.आधी त्यांची तातडीने बदली करण्यात आली आणि नंतर खंडणी, अधिकाऱ्यांना जातिवाचक शिवीगाळ, बुकींकडे पैसे मागितल्याचे आरोप झाल्यानंतर परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आलं. मात्र हे निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. ठाकरे सरकारे सरकारने केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात परमबीर सिंह कोर्टातही जाणार आहेत.

परमबीर सिंह विरुद्ध राज्य सरकार

गेल्या काही दिवसांपासून सतत परमबीर सिंह विरुद्ध राज्य सरकार संघर्ष पहायला मिळत आहे. सचिन वाझे प्रकरणानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांची तात्काळ बदली करत मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी हेमंत नागराळे यांची नियुक्ती केली. त्यानंतर परमबीर सिंहांनी अनिल देशमुखांनी वाझेला खंडणीचं टार्गेट दिल्याचे आरोप केले आणि अनिल देशमुखांविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना हायकोर्टाचा रस्ता दाखवला. मुंबई हायकोर्टात आल्यानंतर या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानंतर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला आणि देशमुखांच्या अडचणी वाढल्या. मात्र त्यानंतर परमबीर सिंह यांच्यावरही खंडणी मागितल्याचे गंभीर आरोप झाले. आणि परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आलं. आता तेच निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. त्यामुळे आता कोर्टात धाव घेतल्यावर परमबीर सिंह यांना दिलासा मिळणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Redmi Note 10S चं नवीन स्टोरेज व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत…

Weather Update : आता उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी, पाऊस अन् वातावरणातही निर्माण होणार गारवा

हिंगोली नगर पालिकेचा नवा फंडा, लस घेणाऱ्यांना लकी ड्रॉ द्वारे बक्षीसं! टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनही जिंकण्याची संधी!

Published On - 3:37 pm, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI