शाहरुख खानला ‘अंकल’ म्हणणारी अभिनेत्री कोण? 9 वर्षांपूर्वी एका गोष्टीमुळे झाली होती प्रसिद्ध
शाहरुख खानला जॉय अवॉर्ड्सच्या कार्यक्रमामध्ये 'अंकल' म्हणणारी ती अभिनेत्री कोण? 9 वर्षांपूर्वी देखील भारतात झाली होती प्रसिद्ध.

Shah Rukh Khan And Hande Ercel: बॉलिवूडचा बादशाह आणि किंग खान म्हणजेच शाहरुख खान अलीकडेच सौदी अरेबियातील रियाध शहरात पार पडलेल्या जॉय अवॉर्ड्स कार्यक्रमात सहभागी झाला होता. या भव्य सोहळ्यात शाहरुखची उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, या कार्यक्रमातून समोर आलेल्या एका व्हिडीओमुळे तुर्कीची प्रसिद्ध अभिनेत्री हांडे अर्शेल अचानक चर्चेत आली आहे.
जॉय अवॉर्ड्सदरम्यान शाहरुख खान आणि इजिप्तची अभिनेत्री अमीना खलील एकत्र मंचावर उपस्थित होते. याच वेळी हांडे अर्शेल आपल्या मोबाईलमध्ये हा क्षण रेकॉर्ड करताना दिसली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, ‘हांडे अर्शेल शाहरुख खानची फॅन आहे’ अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, या चर्चांना हांडे अर्शेलने स्वतः उत्तर दिले.
तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘हा अंकल कोण आहे?’ इतकच नाही तर तिने पुढे स्पष्ट केले की ती शाहरुख खानला नाही तर आपली मैत्रीण अमीना खलील हिचा व्हिडीओ शूट करत होती. ती शाहरुख खानची फॅन नसल्याचेही तिने स्पष्टपणे सांगितले. मात्र ‘अंकल’ हा शब्द वापरल्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद आणि चर्चा रंगली.
कोण आहे हांडे अर्शेल?
हांडे अर्शेल ही तुर्कीची रहिवासी असून ती टर्किश सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय नाव आहे. अभिनयासोबतच तिचे सौंदर्य आणि स्टाईलमुळेही ती मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. हांडेने 2012 मध्ये ‘मिस तुर्की’चा किताब जिंकला होता. या यशानंतर तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले.
2013 मध्ये तिने ‘Calikusu’ या रोमँटिक टीव्ही शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक टर्किश टीव्ही मालिकांमध्ये काम केले. 2016 मध्ये आलेली ‘आस्क लफ्तान अनलमज’ ही मालिका तिच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरली. या मालिकेमुळे ती आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखली जाऊ लागली. विशेष म्हणजे हा शो 30 पेक्षा जास्त देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी प्रसारित झाला.
View this post on Instagram
‘आस्क लफ्तान अनलमज’ ही मालिका 2017 मध्ये भारतात ‘प्यार लफ्जों में कहां’ या नावाने प्रसारित करण्यात आली होती. भारतीय प्रेक्षकांनीही या मालिकेला भरभरून प्रतिसाद दिला आणि हांडे अर्शेलला येथेही मोठी लोकप्रियता मिळाली.
