
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. महत्त्वाच्या शहरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अशातच आता पुण्यातील कोंढवा भागात दहशतवाद विरोधी पथकाने छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाकडून पुण्यातील एका व्यक्तीची कसून चौकशी करण्यात येत आहे. दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा भागात दहशतवादी विरोधी पथकाने छापेमारी केल आहे. यावेळी एका व्यक्तीची कसून तपासणी करण्यात येत आहे. या व्यक्तीला अद्याप ताब्यात घेतलेले नाही, मात्र त्याच्या घराची झडती घेण्यात आली आहे. या कारवाईत लॅपटॉप, हार्डडिस्क आणि काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त करण्यात आले आहेत अशा माहितीही समोर आली आहे.
दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आली आहे. संशयित व्यक्तीकडून जप्त करण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतर या व्यक्तीचा नेमका कुठल्या व्यक्तीशी आहे हे समोर येणार आहे.
याआधी दहशतवादी विरोधी पथकाने मुंब्रा येथील कौसा विभागामध्ये राहणाऱ्या एका शिक्षकाच्या घरी धाड टाकली होती. या कारवाईत अधिकाऱ्यांनी त्याच्या घरातले मोबाईल आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत. सदरचा शिक्षक हा जमात ये इस्लाम या संघटनेशी संबंधित असल्याचे समोर आले आहे, मात्र या व्यक्तीचे नाव काय आहे ह अद्याप समोर आलेले नाही. पोलीस आणि तपास अधिकारी या सर्व प्रकरणांचा तपास करत आहेत.
दरम्यान, दिल्लीतील स्फोटानंतर व्हाईट कॉलर मॉड्यूल संपूर्ण देशात सक्रीय करण्याची तयारी होती अशी माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आला होता. देशातील संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अशातच आता पुण्यातील छापेमारीने खळबळ उडाली आहे.