AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीसाठीचा अर्ज ऑफलाईन की ऑनलाईन स्वीकारणार? निवडणूक आयुक्तांची मोठी घोषणा; दिलासा की टेन्शन?

राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घ्यायच्या आहेत. त्याबाबत आज अखेर घोषणा करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकांबाबतची पत्रकार परिषद घेण्यात आली आहे.

निवडणुकीसाठीचा अर्ज ऑफलाईन की ऑनलाईन स्वीकारणार? निवडणूक आयुक्तांची मोठी घोषणा; दिलासा की टेन्शन?
| Updated on: Dec 15, 2025 | 5:01 PM
Share

महापालिकांच्या निवडणूका अखेर घोषीत झाल्या आहेत. राज्यातील 29  महापालिकांच्या निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. या महापालिका निवडणूकीसाठी अर्ज स्वीकारण्याचे काम 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर होणार आहे. अर्जाची छाननी 31 डिसेंबरपर्यंत होणार आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत 2 जानेवारी 2026, निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी 3 जानेवारी रोजी जाहीर होणार आहे. आणि या निवडणूकीसाठी मतदान येत्या 15 जानेवारी 2026 होणार असून मतमोजणी 16 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.

या निवडणूकीत 3 कोटी 48  लाख मतदार आहेत, त्यात पुरुष मतदार 1 कोटी आणि स्त्री इतर मतदार 4 हजार 590 आहेत. 29 हजार 147 मतदान केंद्रावर इलेक्ट्रॉनिक मशीनने मतदान होणार आहे. मुंबई महापालिकेसाठी 10 हजार 111 मतदान केंद्रे असतील असेही राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी म्हटले आहे.

राज्यातील 29  महापालिकेच्या निवडणूकीबाबतची घोषणा आज करण्यात आले आहे. यातील 27 महापालिकांची मुदत संपली आहे. जालना आणि इचलकरंजी या नवीन महापालिका आहेत. त्यांचीही निवडणूक होणार आहे असेही आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले. महापालिकेत एक सदस्यीय प्रभाग आहेत. महापालिकेसाठी एक मत द्यावे लागेल. 28 महापालिका या मात्र बहुसदस्यीय आहेत. बहुतेक ठिकाणी चार उमेदवार निवडून द्यायचे आहेत. काही प्रभागात तीन तर काही ठिकाणी पाच उमेदवार असणार आहेत. या २८ महापालिकेत मतदारांना तीन ते पाच मते द्यावी लागणार आहेत.

यंदाही ऑफलाईनच कारभार

महापालिकेच्या निवडणूकीसाठी नामर्देशन पत्र हे ऑफलाईनच घेण्यात येणार आहे. राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार हे ऑफलाईन घेण्यात येणार आहे. जात वैधता पडताळणीसाठी राखीव जागेवर लढणाऱ्यांना जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सादर करावे. सत्यप्रत वा अन्य पुरावा द्यावा लागले. त्यानंतर सहा महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्र देण्याचे हमी पत्र द्यावे लागेल. नाही दिले तर निवड रद्द होईल असेही राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा