AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat : मोठी बातमी… भोंदू खरातकडे गेलेल्या त्या बायका येणार अडचणीत? लेखिकेचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र; काय केली मागणी?

नाशिकच्या भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणात नवीन अपडेट आहे. लेखिका अरुणा सबाने यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, ज्या महिला स्वेच्छेने खरातकडे गेल्या, त्यांना 'पीडित' न म्हणता दोषी ठरवून शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तसेच, त्यांनी माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्यावरही कारवाईची मागणी करत या गंभीर प्रकरणात नवं वळण दिलं आहे.

Ashok Kharat : मोठी बातमी... भोंदू खरातकडे गेलेल्या त्या बायका येणार अडचणीत? लेखिकेचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र; काय केली मागणी?
अशोक खरात केस
| Updated on: Apr 03, 2026 | 11:09 AM
Share

मी ज्योतिषी, भविष्य जाणतो, भविष्य सांगतो, असं म्हणत अनेक महिलांना जाळ्यात ओढत, कधी गोड बोलून, भुलवून तर कधी धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात याचचं भविष्य अंधारात आहे. नाशिकच्या ओकस कॉर्नरमधील कार्यालयात महिलांना बोलावून, त्यांना पेढा आणि कडवट-खारट चव असलेलं पेय प्यायला दिल्यावर, त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या खरातने विकृतपणाची परिसीमा गाठत, या सर्व प्रकारचं रेकॉर्डिंगही केलं होतं. अखेर त्याच्या भोंदूत्वाचा बुरखा फाटलाच आणि एका महिलेच्या तक्रारीवरून 17 मार्चला पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून अटक केली. सध्या एसआयटीकडून याप्रकरणाची चौकश सुरू असून अशोक खरात न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.

याच प्रकरणात आता एक मोठी अपडेट आली आहे. प्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरूणा सबाने यांनी या प्रकरणावरून आवाज उठवला असून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे. भोंदूबाबा खरात प्रकरणात महिलांनाही दोषी ठरवा. पिडीत महिलांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा चाकणकर यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणीही सबाने यांनी केली असून चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पिडीत महिलांना कडक शिक्षा व्हावी

लेखिका अरूणा सबाने यांनी खरात प्रकरणावरून टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे. भोंदूबाबा खरात प्रकरणात महिलांनाही दोषी ठरवा, पिडीत महिलांना कडक शिक्षा व्हावी, असं त्यांनी पत्रात म्हटलंय. जर ते व्हिडीओ पाहिले तर महिलांना गुंगीचं औषध दिले असं वाटत नाही, त्या हसत आहे, स्वच्छेने त्या महिला टेबलवर बसत आहेत, असं दिसतं असं म्हणत लैंगिक समाधान मिळवण्यासाठी गेलेल्या महिलांवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली.

ज्या महिला स्वच्छेने भोंदू बाबा कडे गेल्या त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांना पिडीत म्हणता येणार नाही. ज्यांना घरच्यांनी जबरदस्तीने भोंदू कडे पाठवलं, त्यांना आपण पिडीत समजू शकतो. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा चाकणकर यांच्यावर कारवाई व्हावी असंही सबाने म्हणाल्या. सगळ्या शिकलेल्या महिला आहे. अशा भोंदू बाबाच्या आहारी कशा जातात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याप्रकरणात सबाने यांनी मुख्यमंत्र्यांना ई मेल आणि व्हॅाटसॲप द्वारे पत्र पाठवलं आहे. मात्र सबाने यांच्या पत्रामुळे खरातकडे गेलेल्या महिलांच्या अडचणी वाढू शकतात.

खरातच्या मुलाचा खळबळजनक खुलासा

न्यायलयीन कोठडीत असलेल्या अशोक खरातच्या मुलाला SIT ने ताब्यात घेतलं असून सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातचा मुलगा सुरूवातील काहीच बोलत नव्हता, त्याने संपूर्ण मौन बाळगलं. मात्र पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती करताच, तो घडघड बोलू लागला. आमच्या घरात मोठ्या प्रमाणावर कॅश यायची. हे पैसे कुठून आणि कसे येत होते, याबद्दल मला काहीही माहिती नाही. त्याचे सर्व नियंत्रण डॅडकडे (अशोक खरात) होतं. त्यालाच प्रक्येक व्यवहार माहीत होता, अशी कबुली खरातच्या मुलाने दिली आहे. एसआटीकडून या प्रकरणात खरातशी संबंधित अनेक लोकांची, त्याने ज्या डॉक्टरांकडून महिलांना देण्यासाठी औषध घेतली त्यांची तसेच त्याच्या आर्थिक व्यवहाराशी निगडीत लोकांची चौकशी सुरू आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच