लंपट खरात ज्या गुप्त अंधाऱ्या खोलीत महिलांवर अत्याचार करायचा, त्या खोलीचा थेट पंचनामा, तृप्ती देसाई यांची धडक; काय काय दिसलं?

अशोक खरातच्या शिवनिका संस्थानाच्या मंदिरात एक काळोखी खोली देखील आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी या मंदिरातील अंधाऱ्या खोलीची पाहणी केली आहे.

लंपट खरात ज्या गुप्त अंधाऱ्या खोलीत महिलांवर अत्याचार करायचा, त्या खोलीचा थेट पंचनामा, तृप्ती देसाई यांची धडक; काय काय दिसलं?
तृप्ती देसाई
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 24, 2026 | 12:42 PM

सध्या राज्यात अशोक खरात हे प्रकरण चांगलेच तापले आहे. अशोक खरात या भोंदूबाबाने अनेक महिलांवर अत्याचार आणि बलात्कार केले. त्याच्या विरोधात आतापर्यंत सहा तक्रार दाखल केल्या गेल्या आहेत. तसेच खरातचे राजकीय नेत्यांसोबतचे देखील कनेक्शन समोर येत आहेत. खरातकडे अफास संपत्ती आहे. त्याच्या शिवनिका संस्थानाच्या मंदिरात एक काळोखी खोली देखील आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी अशोक खरातचे कनेक्शन असलेल्या संस्थानाच्या मंदिराला भेट दिली. या मंदिरात एक अंधारी खोली असल्याचे समोर आले. तृप्ती देसाई यांनी या मंदिराची पाहणी केली आहे.

काय म्हणाल्या तृप्ती देसाई?

या मिरगाव येथील जाम नदीच्या बाजूला असलेल्या खरातच्या शिवनिका संस्थानाच्या मंदिरात एक अंधारी खोली असल्याचे समोर आले आहे. तृप्ती देसाई मिरगाव दौऱ्यावर असताना शिवनिका संस्थानातील अंधाऱ्या खोलीची पाहणी करण्यासाठी पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “जे खरातचे भक्त होते त्यांच्यावर बराच दबाव आला असता. तो कुठे येऊ नये म्हणून वरिष्ठांमार्फत तो गुन्हा दाखल होणे गरजेचे होते आणि त्यासाठी जेवढं जेवढं आक्रमक काम किंवा त्यामध्ये जे काही टीममध्ये काम करणं असेल, त्याची गुप्तता पाळणे असेल हे सगळं जे आहे जसं सुरुवातीला मी केलं. तुम्ही म्हणालात की माझी काम करण्याची पद्धत ही रस्त्यावर ठाण मांडण्याची आहे. पण या वेळेला जे आहे ते खरातला बेडे पडल्यापाहिजेत. तो परदेशात गेला नाही पाहिजे यासाठी आक्रमक पद्धतीने, गुप्तपणे काम करण्याचे जे काम आहे ती टीमबरोबर केलं.”

पुढे तृप्ती देसाई यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपावर म्हटले की, “एवढ्या घाणेरड्या पद्धतीचे आरोप आमच्या सारख्या सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर करणं, मला असं वाटतय की राजकीय महिलांनी त्यांचे त्यांचे काम करावे. 5 मार्चला मी वारंवार सांगतेय की माझ्याकडे व्हिडीओ आले. त्यानंतर खरातला बेड्या कशा ठोकायच्या यासाठी आम्ही पुढाकार घेतला. संबंधीत पोलिसांकडे गेलो, शासकीय यंत्रणेकडे गेलो आणि मग या मध्ये आता आपण बघतोय की हा जो रिझल्ट जो आहे ना, खरातला रडायला लागलं. आपण बघितलं असेल कायद्याचा जिल्हा नाशिक, नाशिक कायद्याचा बालेकिल्ला हे जे बोलायला लागला ना यासाठी जो पुढार घेतलाय ना तो तृप्ती देसाईने. त्यामुळे मी जे काम केलय ते प्रामाणिक केलय.”

नेमकं प्रकरण काय?

नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी, ‘कॅप्टन’ आणि भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात यांच्यावर लैंगिक छळ, बलात्कार आणि महिलांचे शोषण यासंबंधीचे आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, खरातच्या कथित ‘दैवी शक्ती’च्या नावाखाली चालणाऱ्या अंधश्रद्धा आणि शोषणाच्या साम्राज्याचा पोल खोल झाली आहे. एका गर्भवती महिलेच्या पतीला जेव्हा कळाले की त्याच्या पत्नीसोबत खरातने नको ते केले.

Follow Us