Ashok Kharat : कोल्ड रिडिंग आणि हॉट रिडिंग अन् पाच मिनिटात भविष्य सांगायचा… दहावी नापास लिंगपिसाट खरातच्या मोडस ऑपरेंडीने पोलीसही थक्क

भोंदू अशोक खरातने अनेक महिलांना, त्यात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, भविष्य सांगण्याच्या नावाखाली लैंगिक व आर्थिक फसवणूक केली. एसआयटी तपास करत असून त्याचे फसवणुकीचे तंत्र उघड झाले आहे. कोल्ड आणि हॉट रीडिंगचा वापर करत त्याने लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना लुटले. त्याच्या अमानवी कृत्यांमुळे पोलीसही थक्क झाले आहेत.

Ashok Kharat :  कोल्ड रिडिंग आणि हॉट रिडिंग अन् पाच मिनिटात भविष्य सांगायचा... दहावी नापास लिंगपिसाट खरातच्या मोडस ऑपरेंडीने पोलीसही थक्क
अशोक खरातची मोडस ऑपरेंडी समोर
| Updated on: Mar 27, 2026 | 10:11 AM

असंख्य महिलांचं आयुष्य बरबाद करणाऱ्या लिंगपिसाट अशोक खरातचे नवनवीन कारनामे रोजच समोर येत आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लोकांच्या भावना आणि श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांची आर्थिक लूट करण्याचा सपाटा खरातने लावलाच होताच. पण त्याने महिलांचं लैंगिक शोषण करण्याचाही सपाटा लावला होता. त्याच्या ऑफिसमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातच त्याचे सर्व काळेधंदे कैद झाले आहे. हे प्रकरण उघडकीस येताच संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करत आहेत. एसआयटीच्या तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरात ग्राहकांना कसा जाळ्यात फसवायचा? त्यासाठी तो काय काय करायचा? त्याची मोडस ऑपरेंडी काय होती? याची माहितीच समोर आल्याने एसआयटीचे अधिकारीही हादरून गेले आहेत. विशेष म्हणजे एक दहावी नापास माणूस काय काय करू शकतो या कल्पनेनेच सर्वांना घाम फुटला आहे.

लिंगपिसाट खरातने तपासात अनेक गोष्टी समोर आणल्या आहेत. ग्राहकांचा त्याच्यावर विश्वास बसावा म्हणून तो काय काय करत होता? कशा पद्धतीने तो लोकांना उल्लू बनवायचा? त्याची मोड्स ऑपरेंडी काय होती? याची माहिती त्याने दिल्यानंतर सर्वच थक्क झाले आहेत. अशोक खरातने ग्राहकांना जाळ्यात अडकवण्यासाठी मानसशास्त्राचा पुरेपूर उपयोग केला होता. लोकांच्या समस्या तो आधीच माहिती करून घ्यायचा. त्यांची आधीच माहिती घेऊन तीच माहिती तो ग्राहकांना सांगून दैवी शक्तीने ही माहिती मिळाल्याचा दावा करायचा. त्यामुळे ग्राहकाची त्याच्यावर श्रद्धा बसायची आणि ते त्याच्या जाळ्यात अडकायचे

मोडस ऑपरेंडीने पोलीसही थक्क

मिळालेल्या माहितीनुसार, भोंदू खरात हा ग्राहकांची माहिती गोळा करण्यासाठी स्वतंत्र दोन टीमचा वापर करत होता . तो रेफरन्सद्वारे, नातेवाईकांकडून माहिती संकलन करत होता, अशी माहिती उघड झाली आहे. त्यामुळे ऑफीसमध्ये आलेल्या लोकांना भेटीच्या पहिल्या 5 मिनिटांत अचूक माहिती सांगायचा आणि त्यांचा विश्वास संपादन करायचा. यासाठी तो कोल्ड रीडिंग व हॉट रीडिंग तंत्रांचा वापर करायचा.

हॉट रीडिंग म्हणजे त्यामध्ये आधीच माहिती गोळा करून ठेवली जाते. तर कोल्ड रिडिंगमध्ये पाहिले काही प्रश्न विचारून त्यावरून अंदाज लावत समोरच्याला भ्रमित केलं जातं. मानसशास्त्र व फेस रीडिंगचा प्रभावी उपयोग करत खरातने अनेकांना गंडा घातला, त्यांची फसवमूक करत लुबाडलं. लोकांना भीती घालण्याचं तंत्रही त्याने वापरलं होतं.

अशोक खरातची झाली एच आय व्ही टेस्ट

दरम्यान शेकडो महिलांचं लैंगिक शोषण करण्याचा आरोप असलेला भोंदू अशोक खरात याची HIV टेस्ट करण्यात आली. त्याचे रिपोर्ट समोर आले असून ती टेस्ट निगेटिव्ह आली आहे. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अशोक खरात हा महिलांवर अत्याचार करत होता . सधथ्या तो पोलीस कोठडीत असून नाशिक पोलिसांनी त्याची एच आयव्ही टेस्ट केली. ती निगेटीव्ह आली आहे.

 

Follow Us