माजच उतरला! अशोक खरातच्या घशा खाली घास उतरेना, बायकोबद्दल विचारताच…

अशोक खरात प्रकरण दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आता अशोक खरातने तुरुंगात जेवण कमी केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याला बायकोविषयी प्रश्न विचारताच त्याने दिलेल्या प्रतिक्रियाने सर्वजण चकीत झाले आहेत.

| Updated on: Apr 13, 2026 | 1:01 PM
1 / 5
स्वतःला दैवी शक्तीचा अवतार म्हणवून शेकडो भाविकांना गंडा घालणारा अशोक खरात (Ashok Kharat) आता पूर्णपणे खचला आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस कोठडीचा फास जसजसा घट्ट होत चालला आहे, तसतशी खरातच्या पायाखालची जमीन सरकत आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांना धमकावणारा हा भोंदू आता कोठडीत पुरता हबकला असल्याची माहिती समोर येत आहे.

2 / 5
तपास पथकातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कोठडीच्या पहिल्या दोन-तीन दिवसांत अशोक खरातचा तोरा पूर्णपणे वेगळा होता. तो तपास करणाऱ्या पोलिसांना सांगत होता, “तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर देवाचा कोप होईल.” तो चक्क पोलिसांचे भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, SIT आणि ED च्या कडक चौकशीमुळे आता त्याची बोलती पूर्णपणे बंद झाली आहे. आपण सहज तुरुंगातून बाहेर पडणार नाही, याची खात्री पटल्याने तो स्वतःच्या भविष्याबद्दल कमालीचा चिंतेत आहे.

3 / 5
सध्या खरात कोठडीत फारसा कोणाशी बोलत नाही. तपासादरम्यान विचारलेल्या प्रश्नांना तो फक्त त्रोटक उत्तरे देतो. चिंतेमुळे त्याचे जेवणही लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. तो तासनतास शांत बसून राहतो, असे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, बाहेर पडल्यानंतर लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल या भीतीने, तो न्यायालयीन सुनावणी प्रत्यक्ष न होता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारेच करण्याची वारंवार विनंती करत आहे.

4 / 5
अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार आहे. ती कुठे आहे असा प्रश्न विचारला असता, खरातने “ते देवालाच माहीत” असे म्हणत हात झटकले. मात्र, आपल्या लाडक्या मुलगा हर्षवर्धनसाठी तो अतिशय व्याकुळ झाला आहे. “माझ्या मुलाची मला खूप काळजी वाटते, मला त्याच्याशी एकदा तरी फोनवर बोलू द्या,” अशी विनंती तो पोलिसांकडे सतत करत आहे.

5 / 5
दरम्यान, भोंदू अशोक खरातला आज (१३ एप्रिल) पुन्हा नाशिक कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्याची पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला कोर्टात आणले जाईल. तिसऱ्या गुन्ह्यात त्याला कोठडी देण्यात आली होती, तर चौथ्या गुन्ह्यात पुन्हा कोठडी मिळवण्यासाठी SIT प्रयत्न करणार आहे. सध्या SIT कडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या तपासाचा तपशील तपास यंत्रणा आज कोर्टात सादर करणार आहे. अशोक खरातला आज ऑनलाइन पद्धतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे समजते.

Follow Us