
नाशिकमधील बहुचर्चित ‘स्वघोषित कॅप्टन’ अशा नावाने ओळखला जाणारा भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला महिलेवरील बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली. अंकशास्त्कज्ञ, ज्योतिषी असल्याचे सांगत त्याने अनेकांची फसवणूक केली, कित्येक महिलांचे लैंगिक शोषण केलं. एवढंच नव्हे तर त्याच्या कार्यालयात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे सगळे किळसवाणे प्रकार रेकॉर्डही झाले. असे सुमारे 60 पेक्षा जास्त व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे, खरातची पोलिस कोठडी आज संपणार असून त्याला नाशिक कोर्टात हजर करण्यात येणार आहे. भोंदू बाबा खरात विरोधात आत्तापर्यंत पाच गुन्हे दाखल झाले असून त्याच्या गुन्ह्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
याप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली असून चौकशी व तपासानंतर अनेक काळी कृत्य, खरातचे अनेक कारनामे उघडकीस येत आहेत. याचदरम्यान खरातच्या काळ्या इतिहासाबद्दलही काही माहिती समोर येत आहे. ज्योतिषविद्या करण्याआधी तो नेमका काय करायचा, अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू असून राज्यभरात याप्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे. त्याच्याबद्दलची अनेक धक्कादायक सत्यही उघडकीस येताना दिसत आहेत.
जहाजावर कॅप्टन नव्हे खरातने केली मजुरी
अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील सेवानिवृत्त अधिकारी असल्याचीही माहिती पुढे आली होती. मर्चंट नेव्हीमध्ये सुमारे 2 दशकं वर्षे सेवा बजावली असा दावा त्याने केला होता, तो कॅप्टन पदावरून निवृत्त झाल्याचेही बोलले जात होते. मात्र हे सर्व खोटं असून तो स्वत:च स्वत:ला कॅप्टन म्हणवून घ्यायचा असं उघड झालंय. तो काही कॅप्टन नव्हता तर जहाजावर मजूर म्हणून काम करायचा अशी माहितीही उघड झाली आहे.
अल्पवयीन असतानाच केलं दुष्कृत्य
महिलांवर अत्याचार, त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या खरातच्या पूर्वायुष्यातील काळे कारनामे, त्याचा गडद इतिहास आता समोर येऊ लागला आहे. तो अल्पवयीन होता, तेव्हाच त्याने कुकर्म केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घराचं नावं बदनाम झालयामुळे नातेवाीकांनी त्याला मार दिला होता, बदडून काढलं होतं, आपल्या कुकर्मामुळे झालेली बदनामी आणि खालेल्ला मार यामुळे तो गावातून पळाला अशीही माहिती उघड झाली आहे.
बरीत वर्ष मजूर म्हणून कम केल्यावर थायलंडमध्ये त्याचा गुन्हेगांराशी संपर्क आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस त्याची अधिक चौकशी करीत आहेत. कष्टमय जीवनानंतर झटपट श्रीमंत होण्यासाठी खरात ज्योतिषविद्या शिकला. अनेक छोटे मोठे उद्योजक, समाजातील प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक अशा मंडळींचे भविष्य पाहायला त्याने सुरुवात केली. अडल्या नडल्या लोकांचे भविष्य पाहून त्यांना मार्ग दाखवला, असा दावा खरात अनेक वर्ष करत होता.
मात्र 2022 साली राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सिन्नरच्या मिरगावात गेले, तेथील मंदिरात त्यांनी पूजा केली, तेव्हापासूनच खरातचं नाव जास्त चर्चेत आलं. त्यानंतर राज्यातील अनेक महत्त्वाचे नेते, प्रशासनातील बडे अधिकारी, पोलीस खात्यातील अधिकारी, उद्योजक, चित्रपट सृष्टीतील कलाकार अशा लोकांचं खरातकडे येणं-जाणं वाढलं. याच माध्यमातून त्याने कोट्यवधी संपत्ती जमवली. राज्यात अनेक भागांत त्याने जमिनीही विकत घेतल्या. निरगावात मोठा फार्महाऊसही त्याने बांधलं. मात्र महिलांवरील अत्याचाराच्या आरोपानंतर सध्या तो तुरूंगाची हवा कात असून इतरांचे भविष्य सांगणाऱ्या खरातचं भविष्य सध्या अंधारात दिसत आहे.