AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asim Sarode | राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत असीम सरोदे म्हणतात...

Asim Sarode | राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत असीम सरोदे म्हणतात…

| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 5:34 PM
Share

राज्य सरकार (State government) संविधानाच्या (Constitution) प्रक्रियेनुसार चालु शकत नाही. कायद्याचे राज्य म्हणून अस्तित्वात येऊ शकत नाही, अशा वेळी 354 घटनेतील तरतुदीनुसार राष्ट्रपटी राजवट लावली जाऊ शकते, अशी माहिती कायदेतज्ज्ञ असीम सरोदे (Asim Sarode) यांनी दिली आहे.

जेव्हा संविधानाने आखुन दिलेल्या प्रक्रियेनुसार राज्य सरकार चालण्यास अक्षम असते आणि राज्य सरकार (State government) संविधानाच्या (Constitution) प्रक्रियेनुसार चालु शकत नाही. कायद्याचे राज्य म्हणून अस्तित्वात येऊ शकत नाही, अशा वेळी 354 घटनेतील तरतुदीनुसार राष्ट्रपटी राजवट लावली जाऊ शकते, अशी माहिती कायदेतज्ज्ञ असीम सरोदे (Asim Sarode) यांनी दिली आहे. पुढे ते म्हणाले, की सध्या अशी कोणतीही परिस्थिती महाराष्ट्र राज्यात नाही. त्यामुळे कोणलातरी अटक होणे, कोणालातरी गुन्ह्यात अडकवणे किंवा अडकले जाणे, या कारणावरून राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकत नाही. सध्या नवाब मलिका ईडीच्या कोठडीत आहेत. यावरून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यांनी केलेल्या अशाप्रकारच्या मागण्या कायद्याला धरून आहेत का, असा सवाल आता विचारला जात आहे. दरम्यान, सरोदे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले.