Manoj Jarange Patil Health Update : मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अधिकच खालावली, वैद्यकीय पथक दाखल, उपचार देण्याचा प्रयत्न…
गेल्या 29 ऑगस्ट पासून नऊ दिवस मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. गेले काही दिवस त्यांची प्रकृती खालावलेली असताना आज सायंकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

गेल्या 29 ऑगस्ट पासून नऊ दिवस मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. गेले काही दिवस त्यांची प्रकृती खालावलेली असताना आज सायंकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याचे सूत्रांनी सांगितले. अंतरवाली सराटीत रात्री वैद्यकीय पथक दाखल झालेले असुन उपचार देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान,जरांगे यांच्या प्रकृती तपासण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक आणि टीम दाखल झाली आहे. मात्र, जरांगे पाटलांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. वैद्यकीय पथक दाखल झालेले असून जरांगे यांना उपचार घेण्यासाठी विनंती केली जात आहे.
मनोज जरांगे यांनी ५८ लाख नोंदणी नुसार कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावी अशी मागणी लावून धरली असून उपोषण मागे घेण्यास नकार दिला होता. रविवारी सायंकाळी त्यांची प्रकृती अधिक खालावली. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथक दाखल झाले आहे. त्यांच्यावर उपचारासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेले काही दिवस मनोज जरांगे यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पथक दाखल झाले आहे.
उपोषण मागे घेण्याचे आवाहन
साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटलांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार प्रत्येक गावात कुणबी नोंदींच्या याद्या लावण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचेशंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाला धक्का लावणार नाही, या भूमिकेवर सरकार ठाम असून मराठा आरक्षणाचे कागदपत्रे आणि कायदेशीर प्रक्रिया वेगाने सुरू आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेत औषधोपचार सुरू करावेत आणि उपोषण मागे घ्यावे, असे आवाहनही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
