AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan: येरवडा शब्द ऐकताच सलमान खान दचकला; म्हणाला, ‘कशाला आठवण करून देतोय हे सगळं…’

Salman Khan: ‘येरवडा’ म्हटल्यावर सलमानने केलेली मिश्कील प्रतिक्रिया हा प्रीमियरमधील हलकाफुलका क्षण ठरला. पुण्याचा प्रसिद्ध रॅपर यंग डीएसए बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे.

Salman Khan: येरवडा शब्द ऐकताच सलमान खान दचकला; म्हणाला, ‘कशाला आठवण करून देतोय हे सगळं...’
Salman KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 06, 2026 | 11:09 PM
Share

‘बिग बॉस 20’चा ग्रँड प्रीमियर सध्या चांगलाच चर्चेत आहे. शोमध्ये यंदा अनेक चर्चित चेहरे सहभागी झाले असून, त्यापैकी रॅपर यंग डीएसएची एण्ट्रीही लक्षवेधी ठरली. यंग डीएसएने आपल्या खास रॅपिंग अंदाजाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र, प्रीमियरच्या मंचावर त्याची आणि सलमान खानची झालेली बातचीत अधिक चर्चेत आली आहे. यंग डीएसएची ओळख करून घेताना सलमान खानने त्याला सहज प्रश्न केला की, “तू कुठून आहेस?” यावर रॅपरने अजिबात वेळ न दवडता आपलं उत्तर दिलं. तो म्हणाला, “पुणे, येरवड्यातून.” यंग डीएसएने आपलं ठिकाण सांगताच सलमानच्या चेहऱ्यावरचे हावभाव अचानक बदलले.

यंग डीएसएचं उत्तर ऐकल्यानंतर सलमानने मजेशीर अंदाजात प्रतिक्रिया दिली. “कशाला आठवण करून देतोय हे सगळं,” असं म्हणत त्याने रॅपरची फिरकी घेतली. त्यानंतर सलमानने आणखी एक मजेशीर टिप्पणी करत, “सांगतोय की घाबरवतोय,” अशा अंदाजात वातावरण हलकंफुलकं केलं. सलमान आणि यंग डीएसए यांच्यातील हा संवाद ऐकून प्रेक्षकांमध्येही हशा पिकला.

येरवडा कारागृह आणि सलमानचं कनेक्शन

2015 मधील हिट अँड रन खटल्याच्या सुनावणीदरम्यान सलमानला शिक्षेची कारवाई झाल्यास त्याला पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्याचा पोलीस विचार करत होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केल्यामुळे त्याला येरवडा कारागृहात जावं लागलं नाही.

यानंतर सलमानने रॅपरला आणखी एक थेट प्रश्न विचारला. “कधी कुठल्या गँगमध्ये सामील झाला आहेस का?” असा प्रश्न सलमानने केला. त्यावर यंग डीएसएने स्पष्टपणे “नाही” असं उत्तर दिलं. ‘बिग बॉस’च्या मंचावर सलमान अनेकदा स्पर्धकांची मजेशीर पद्धतीने फिरकी घेताना दिसतो. यंग डीएसएसोबतच्या संवादातही त्याचा हाच अंदाज पाहायला मिळाला.

दरम्यान, यंदाच्या सिझनमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यामुळे घरात कोण कोणाशी भिडणार, कोणाची मैत्री होणार आणि यंग डीएसएचा गेम नेमका कसा रंगणार, याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. पुणे आणि येरवड्याचा संदर्भ देत सलमानने केलेल्या या मिश्कील संवादामुळे मात्र प्रीमियरमधील हा क्षण विशेष लक्षात राहणारा ठरला.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली