AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger Shroff: टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट; आरोपींची बस चुकली अन्.., तपासात धक्कादायक खुलासा

Tiger Shroff: अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. या प्रकरणात तपासादरम्यान आरोपींच्या प्लॅनविषयी नवी माहिती समोर आली आहे.

Tiger Shroff: टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट; आरोपींची बस चुकली अन्.., तपासात धक्कादायक खुलासा
टायगर श्रॉफच्या गाडीवरील गोळीबारानंतर आरोपींचा पळून जाण्याचा प्लॅन फसलाImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 25, 2026 | 11:11 AM
Share

Tiger Shroff: अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी पळून जाण्याची योजना आखली होती. सुरतमधून बसने दिल्ली गाठून त्यानंतर नेपाळच्या सीमेत प्रवेश करण्याचा त्यांचा मूळ प्लॅन होता. मात्र, दिल्लीला जाणारी बस चुकल्याने त्यांना आपली योजना बदलावी लागली. मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात आरोपींच्या हालचाली आणि त्यांनी आखलेल्या पळून जाण्याच्या कथित कटाचा उलगडा झाला आहे.

बस चुकली अन् आरोपींनी आखला दुसरा प्लॅन

तपासातील माहितीनुसार, टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार केल्यानंतर तिन्ही आरोपींनी मुंबई सोडून सुरत गाठलं. तिथून बसने दिल्लीला जाण्याची आणि पुढे नेपाळमध्ये प्रवेश करण्याची त्यांची योजना होती. मात्र, आरोपी बसस्थानकावर पोहोचले तेव्हा दिल्लीला जाणारी बस आधीच निघून गेली होती. त्यामुळे त्यांचा पहिला प्लॅन फसला. यानंतर या प्रकरणातील कथित सूत्रधार अनिल पंडित याने दुसरी योजना सक्रिय केल्याचा आरोप आहे. आरोपी अंकित खटकमार्फत व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (VoIP) कॉलद्वारे गोळीबार करणाऱ्यांना नव्या सूचना देण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे. या सूचनांनुसार आरोपींनी पुढील प्रवासाची दिशा बदलली.

फूल सिंग, रेहान अन्सारी आणि हृतिक कुमार या तिन्ही आरोपींनी ऑटो-रिक्षाने सुरत रेल्वे स्थानक गाठलं. त्यानंतर पहाटे सुमारे 1 वाजून 33 मिनिटांनी त्यांनी पुणे-जयपूर एक्स्प्रेस पकडली. रेल्वेने प्रवास करताना पोलिसांकडून तपासणी होण्याची भीती आरोपींना होती, असा तपास यंत्रणांचा दावा आहे. त्यामुळे ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी त्यांनी गोळीबारासाठी वापरलेली दोन शस्त्रं आणि दारूगोळा सुरत बसस्थानकाजवळील एका मोकळ्या जागेत लपवल्याचा आरोप आहे.

आरोपींचा दुसरा प्लॅनही पोलिसांच्या तपासात महत्त्वाचा ठरला. जयपूरच्या बाहेरील मुख्य रेल्वे स्थानकावर ट्रेन पोहोचण्यापूर्वीच उतरून पुढील प्रवास रस्तेमार्गे करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर बस किंवा टॅक्सीने दिल्लीच्या दिशेने जाऊन नेपाळच्या सीमेत प्रवेश करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मुंबई गुन्हे शाखेनं सुरत बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींच्या हालचालींचा माग काढला. बस चुकल्यानंतर त्यांनी कोणता मार्ग निवडला, ट्रेन कशी पकडली आणि प्रवासादरम्यान काय केलं, याची माहिती तपासात पुढे आली.

Follow Us
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती..
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती लागली आहे....
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती