आम्हाला अर्थ खाते पाहिजेच… छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मोठी प्रतिक्रिया, थेट..
राष्ट्रवादी अर्थ खात्यासाठी आग्रही आहे. राष्ट्रवादीच्या राज्यातील महत्वाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मोठी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटींचा मोठा बॉम्ब फोडला. ज्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यातच आता अर्थखात्यावरून राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. राज्यातील राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अर्थखाते मिळण्याबद्दल त्यांनी ही भेट घेतल्याची माहिती मिळतंय. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि भाजपाचे नेते एकमेकांवर 500 कोटींच्या जरांगेंच्या दाव्यावरून आरोप प्रत्यारोप करत आहेत, त्यातच राष्ट्रवादी अर्थखात्यासाठी आक्रमक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी मोठे विधान केले. छगन भुजबळ यांनी म्हटले की, सुनेत्रा पवार आमच्या उपमुख्यमंत्री आहेत. अर्थखाते आम्हाला परत मिळायला हवे. आमचे हक्काचे ते खाते आहे. ते परत देणार होते. मुख्यमंत्री यांनी सकारात्मकता दाखवली आहे.
अमित शाह यांनी पूर्णपणे स्वातंत्र्य जे आहे ते मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यामुळे नक्कीच सकारात्मक विचार आमचा होईल. आम्ही काँग्रेससोबत होतो त्यावेळी देखील असं घडत होत. आमची जागा एखादी घेतली तर दुसरी पुन्हा आम्हाला मिळत होती. आम्हाला अर्थ खाते पाहिजेच आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी आम्हाला खातं मिळेल असं वाटतं, असेही भुजबळांनी म्हटले.
इतर कुठेलेही खाते अदलाबदल होणार नाही. विलिनिकरणाची कोणतीही चर्चा नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असून त्यांच्यात बैठक झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र, त्यावर स्पष्ट शब्दात बोलताना छगन भुजबळ दिसले, त्यांनी सांगितले की, विलिनिकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.
अजित पवार यांच्याकडे राज्याचा अर्थ विभागाचा कारभार होता. मात्र, त्यांच्या निधनानंतर अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे घेतले. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेतले. मात्र, अर्थखाते हे अजूनही फडणवीसांकडेच आहे. आता याच अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेत आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखे ठरेल.
