AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Radhika Aapte: आलिया, दिपीकामुळे राधिका आपटेला करावं लागतंय ‘तसल्या’ चित्रपटांत काम, नेमकं काय म्हणाली?

Radhika Aapte Akka Series: बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने नुकतेच दिपीका पादुकोण आणि आलिया भट्टचा उल्लेख करत एक विधान केले आहे ज्याची चर्चा रंगली आहे.

Radhika Aapte: आलिया, दिपीकामुळे राधिका आपटेला करावं लागतंय 'तसल्या' चित्रपटांत काम, नेमकं काय म्हणाली?
| Updated on: Oct 25, 2026 | 11:46 AM
Share

Radhika Aapte News:  अभिनेत्री राधिका आपटेने तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत असते. तिने आपल्या अभिनयाने कमी कालावधीत चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतीच ति अक्का वेबसिरीजमुळे चर्चेत आली आहे. तिच्या ‘अक्का’ या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून ती अनेक मुलाखती देत ​​आहे. या मुलाखतीत तिने एक विधान केले ज्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

एका मुलाखतीत तिने सांगितले की, “हिंदी चित्रपटसृष्टीत बहुतेक अभिनेत्रींना पुरुष नायकांसोबतच चित्रपटांमध्ये काम करावे लागते. याचे कारण असे की, महिला-प्रधान चित्रपटांना थिएटरमध्ये चांगली ओपनिंग मिळवणे कठीण जाते. एखाद्या महिला-प्रधान चित्रपटात आलिया भट्ट किंवा दीपिका पदुकोणसारखी मोठी स्टार असेल तरच तो बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग मिळवू शकतो.”

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत राधिका म्हणाली, “मी एखादा प्रोजेक्ट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल की ओटीटीवर, यावर निवडत नाही. माझ्यासाठी ते फारसे महत्त्वाचे नाही. चित्रपट कुठे प्रदर्शित होईल हे अनेक व्यावसायिक निर्णयांवर अवलंबून असते. मला फक्त एवढेच हवे आहे की चित्रपट कसातरी प्रदर्शित व्हावा.”

राधिका पुढे म्हणाली की, “बॉक्स ऑफिस डोळ्यासमोर ठेवूनच अभिनेत्रींना पुरुष नायकांसोबत चित्रपटांमध्ये काम करावे लागते.  गेल्या काही वर्षांपासून, फक्त थिएटरमध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट पाहून कोणते चित्रपट चालत आहेत आणि कोणते नाहीत, हे ओळखणे कठीण झाले आहे. जर मी एखाद्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली, तर तो चित्रपट कितीही चांगला असला तरी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेलच असे नाही. मी आलिया भट्ट किंवा दीपिका पदुकोणसारखी थोडी आहे, ज्यांच्या चित्रपटांकडून किमान चांगल्या ओपनिंगची अपेक्षा केली जाऊ शकते. म्हणूनच मला पुरुष नायक असलेल्या चित्रपटांमध्ये काम करावे लागते.”

राधिका आपटे ‘अक्का’ या सिरीजमध्ये झळकणार आहे. ही १९८० च्या दशकातील एक गँगस्टर ड्रामा आहे. राधिकासोबत कीर्ती सुरेश देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका ३० ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

Follow Us
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती..
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती लागली आहे....
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती