ATS ची मोठी कारवाई; ‘या’ शहरात जिलेटीनच्या तब्बल 1500 कांड्या जप्त

फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशतवादविरोधी पथकाने अंदाजे 1200 ते 1500 जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या केल्या आहेत. (amravati ats seized gelatin)

ATS ची मोठी कारवाई; 'या' शहरात जिलेटीनच्या तब्बल 1500 कांड्या जप्त
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 8:04 PM

अमरावती : दहशतवादी विरोधी पथकाने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठी कारवाई केली आहे. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशतवादविरोधी पथकाने अंदाजे 1200 ते 1500 जिलेटीनच्या कांड्या जप्त केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार स्फोटक पदार्थांचा हा साठा तीन वाहनांमध्ये भरून ठेवलेला होता. (ATS seized near about 1200 gelatin sticks found in Amravati)

मिळालेल्या माहितीनुसार मालेगावमधील फ्रेजपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मासोद येथे जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेल्या तीन गाड्या असल्याचे दहशतवाद विरोधी पथकाला समजले. त्यानंतर एटीएसच्या पथकाने कारवाई करण्यासाठी सापळा रचला. एटीएसने फ्रेजपुरा येथील मासोदमध्ये कारवाई करत येथील अंदाजे 1200 ते 1500 जिलेटीनच्या कांड्या जप्त केल्या. सध्या या कांड्यांना मोजण्याचे काम सुरु आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात जिलेटीनच्या कांड्या नेमक्या आल्या कुोठून याचासुद्धा तपास एटीएसकडून सुरु आहे.

यापूर्वीसुद्धा जिलेटीनच्या कांड्या जप्त

एवढ्या मोठ्या प्रमाणात जिलेटीनच्या कांड्या सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अमरावतीमधील तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये 19 मार्च रोजी जिलेटीनच्या कांड्या सापडल्या होत्या. यावेळी पोलिसांनी 25 किलो जिलेटीनसह काही स्फोटकं ताब्यात घेतली होती.

जिलेटीनच्या कांड्या किती घातक?

जिलेटीनच्या कांड्यांचा वापर स्फोटकं म्हणून केला जातो. विशेषत: खाणकाम, विहिरी खणणं, मोठमोठे दगड फोडणे किंवा दगड खाणींमध्ये जिलेटीनचा वापर केला जातो. लांबून वात पेटवून स्फोट घडवून दगड फोडण्यासाठी विशेषत: जिलेटीनचा वापर केला जातो. मात्र जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट होऊन अनेकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या यापूर्वी अनेकवेळा आल्या आहेत. एका जिलेटीनच्या कांडीत भीषण स्फोटाची क्षमता असते.

इतर बातम्या :

धक्कादायक..अमरावतीमध्ये जिलेटीनच्या 200 कांड्या आढळल्यानं खळबळ, एकाला अटक

(ATS seized near about 1200 gelatin sticks found in Amravati)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.