धक्कादायक..अमरावतीमध्ये जिलेटीनच्या 200 कांड्या आढळल्यानं खळबळ, एकाला अटक

धक्कादायक..अमरावतीमध्ये जिलेटीनच्या 200 कांड्या आढळल्यानं खळबळ, एकाला अटक
अमरावतीमध्ये जिलेटीन आढळलं

अमरावती जिल्ह्यातही पचंवीस किलो जिलेटनसह स्फोटकं आढळली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. Amravati gelatine sticks

Yuvraj Jadhav

|

Mar 19, 2021 | 6:13 PM

अमरावती: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ आढळली होती. स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनचच्या कांड्या आढळलल्यानं खळबळ माजली होती. अंबानी यांच्या घराजवळ आढळेलल्या स्फोटकांच्या तपासावरुन राज्याचं राजकारण तापलेलं असताना अमरावती जिल्ह्यातही पचंवीस किलो जिलेटीनसह स्फोटकं आढळली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. ( Amravati two hundred gelatine sticks found in tivasa one accused arrested)

जिलेटीन कांड्या आढळल्यानं खळबळ

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये तब्बल पंचवीस किलो जिलेटिन कांडय़ा पोलिसांनी जप्त केले आहे. तर त्याचबरोबर जवळपास दोनशे नग डिटोनेटर सुद्धा पोलिसांनी हस्तगत केले आहे. सदर प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. तर, सदर जिलेटिन व डिटोनेटरचा वापर कशासाठी व कुणाच्या सांगण्यामुळे करण्यात येत होता याचे कोडे मात्र अजून उलगडलेले नाही. ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताफीने एका आरोपीला अटक केलेली आहे तर एक आरोपी मात्र फरार झालेला आहे.

तिवसामधील पंचवटी चौकात युवकाला अटक

तिवसा येथील पंचवटी चौकात एक युवक संशयितरीत्या जात असताना त्याच्याजवळ कदाचित दारू असावी असा संशय पोलिसांना आला. पण त्याचा पाठलाग केला असता सदर आरोपीने त्याच्याजवळील जिलेटिन व डेटोनेटर नी भरलेली बॅग घेउन पळ काढला . पळालेल्या युवकाचा संदर्भात माहिती घेतल्यानंतर सदर युवक हा सुमीत अनिल सोनवणे राहणार सातरगाव तिवसा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने पंचवीस किलो स्फोटके डिटोनेटर हे अंकुश लांडगे करजगाव लोणी याला विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी अंकुश लांडगेकडे मोर्चा वळल्याबरोबर व त्याची चाहूल आरोपीला लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

पोलिसांकडून तपास सुरु

पोलिसांनी सदर ठिकाणावरून दोनशे नग जिलेटिन व दोनशे नग डिटोनेटर हस्तगत केलेली आहेत. मात्र, ही जिलेटिन व डिटोनेटर स्फोटके नेमके कशासाठी व कुणाच्या आदेशाने आणण्यात आली याचा तपास आता तिवसा पोलीस करत आहेत, अशी माहिती तिवसा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी दिली आहे.

जिलेटीनचा वापर नेमका कशासाठी होतो?

जिलेटीनचा वापर महाराष्ट्रात सर्वाधिक विहिर फोडण्यासाठी आणि दगडाच्या खाणीत मोठमोठे दगड फोडण्यासाठी केल्या जातो होतो.

संबंधित बातम्या:

अमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्यांत तातडीने कंटेनमेंट झोन जाहीर करा, मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश 

अमरावती शहरात 12 प्रतिबंधित क्षेत्र जाहीर, मनपा आयुक्तांकडून प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

( Amravati two hundred gelatine sticks found in tivasa one accused arrested)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें