What is gelatin dynamite : खाणीतील महाकाय दगड ब्लास्ट करण्याची क्षमता, 1 जिलेटीन कांडी किती घातक?

What is gelatin dynamite : खाणीतील महाकाय दगड ब्लास्ट करण्याची क्षमता, 1 जिलेटीन कांडी किती घातक?
gelatin rod explosive

मुकेश अंबानी (Mukesh Ambani Antilia house) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली आहे. धक्कादायक म्हणजे या स्फोटकांसोबत एक धमकी देणारं पत्र सापडल्याची माहिती आहे.

सचिन पाटील

|

Feb 25, 2021 | 8:42 PM

मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी (Mukesh Ambani Antilia house) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली आहे. (Explosives near Mukesh Ambani house) धक्कादायक म्हणजे या स्फोटकांसोबत एक धमकी देणारं पत्र सापडल्याची माहिती आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. IPS विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांना जिलेटिनच्या 20 कांड्या सापडल्या आहेत. (Explosives near Mukesh Ambani house What is gelatin dynamite)

अत्यंत व्हीआयपी रस्ता, श्रीमंताची रेलचेल असलेला परिसर म्हणून अंबानींच्या निवासस्थानाची ओळख आहे. मात्र अंबानींच्या घराजवळ अज्ञात कार येते, त्यामध्ये स्फोटकं भरलेली असतात, ती कार तिथे सोडून आरोपी निघून जातो, हे सुरक्षेमध्ये हलगर्जीचं लक्षण आहे. या सर्व प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने पावलं उचलली आहेत. या प्रकरणाच्या मूळाशी जाण्याचं आश्वासन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

मुंबई येथील मुकेश अंबानींच्या घराच्या काही अंतरावर एक स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या २० कांड्या सापडल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मुंबई क्राईम ब्रांच करत आहे. लवकरात लवकर सत्य समोर येईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

जिलेटीनच्या कांड्या किती घातक?

जिलेटीनच्या कांड्यांचा वापर स्फोटकं म्हणून केला जातो. विशेषत: खाणकाम, विहिरी खणणं, मोठमोठे दगड फोडणे किंवा दगड खाणींमध्ये जिलेटीनचा वापर केला जातो. लांबून वात पेटवून स्फोट घडवून, या दगड फोडण्यासाठी विशेषत: जिलेटीनचा वापर केला जातो. मात्र जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट होऊन अनेकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या यापूर्वी अनेकवेळा आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच कर्नाटकातील दगडखाणीत स्फोट होऊन जागेवर 5 कामगारांचा मृत्यू झाला होता.

एका जिलेटीनच्या कांडीत भीषण स्फोटाची क्षमता असते. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ तर 20 जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. त्यामुळे या कांड्यांची तीव्रता किती असू शकते याचा अंदाज येऊ शकतो.

(Explosives near Mukesh Ambani house What is gelatin dynamite)

संबंधित बातम्या  

VIDEO : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं भरलेली स्कॉर्पिओ, घातपाताच्या उद्देशाचा संशय

explosives car near ambani house : अंबानींच्या घराबाहेर स्फोटक भरलेली कार, थरार दर्शवणारे 5 फोटो

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें