माथेरानच्या घाटात ‘रिल्स’ बनवण्याच्या नादात कार 30 फूट रेल्वे ट्रॅकवर कोसळली, काय घडलं नेमकं…

माथेरानला मोबाईल 'रिल्स' बनवण्याच्या नादात कार घसरुन २० ते ३० फूट घरंगळत रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याची घटना घडली आहे. यावेळी सुदैवाने मिनी ट्रेन येथून जात नव्हती, अन्यथा मोठा अपघात घडला असता असे म्हटले जात आहे.

माथेरानच्या घाटात रिल्स बनवण्याच्या नादात कार 30 फूट रेल्वे ट्रॅकवर कोसळली, काय घडलं नेमकं...
matheran mini train accident
| Updated on: Nov 29, 2026 | 8:12 PM

नेरळ ते माथेरान दरम्यान माथेरान घाटाच्या रस्त्यावर अनेक पर्यटक मिनी ट्रेन, रेल्वे ट्रॅक, माथेरान व्हॅलीचे फोटो व्हिडिओ काढायला थांबत असतात.याच वेळी रिल्स काढण्याच्या नादात कार घसरुन रेल्वे ट्रॅकवर गेल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. या कारमध्ये कोणी बसले नसल्याने सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नसल्याचे म्हटले जात आहे. माथेरानमध्ये आज रविवारी सुटीच्या निमित्ताने पर्यटक मोठ्या प्रमाणात माथेरानमध्ये येत असताना ही घटना घडल्याने काळजी व्यक्त केली जात आहे.

matheran car accident news

नेरळहून माथेरानला जाताना लागणारे पहिले रेल्वे स्टेशन जुम्मापट्टी येथे काही पर्यटक रस्त्याच्या बाजूला कार घेऊन ‘रिल्स’ बनवत असताना अपघात घडला आहे. यावेळी त्यांना अंदाज न आल्याने पर्यटकांची कार 25-30 फूट खाली असलेल्या रेल्वे ट्रॅकवर कोसळली.यावेळी कारमध्ये कोणी नसल्याने कोणालाही इजा झाली नाही. तसेच नेरळ ते माथेरान धावणारी मिनीट्रेन जुम्मापट्टी स्थानकात पोहचली होती.

Loading...

कर्जत जवळील डिकसळ येथील सुरज पटेल आपल्या बदलापूर येथील मित्रांसोबत माथेरान घाटात फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी मोबाईलवर रील्स बनवण्याचा प्रयत्न सुरु केला. यात दोन तरुण आणि तीन तरुणी होत्या. त्यांच्या कारचा नियंत्रण सुटून ती अचानक चढणीवरुन खाली गेली. यावेळी सुदैवाने कारमध्ये कोणीही न्हवते. तसेच यावेळी नेरळ ते माथेरान जाणारी मिनी ट्रेन जुम्मा पट्टी या स्थानकात पोहचलेली होती. सकाळी ही घटना घडली असून या अपघात सुदैवाने कोणाला हानी झाली नसली तरी रिल्स बनवण्याच्या नादात सुरक्षेची कशा प्रकारे हेळसांड होत असते हे उघडकीस आले आहे.

सुरक्षेशी हेळसांड

माथेरान येथे रुळांशेजारी रिल्स बनवणे किती धोकादायक आहे हे या घटनेवरुन स्पष्ट झाले आहे. हा अपघात सकाळी झाला असून या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, या पर्यटकांच्या कारचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या प्रकरणाचा पुढील तपास नेरळ पोलीस करीत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us