Rohit Pawar: पार्थ-जयमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न…; रोहित पवारांचा खळबळजनक दावा, राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांवरही निशाणा

Rohit Pawar News: जय-पार्थ यांच्यात वाद लावण्याच्या प्रयत्न होत असल्याचा रोहित पवारांनी दावा केला आहे. त्यांनी जय आणि पार्थ पवारांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

Rohit Pawar: पार्थ-जयमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न...; रोहित पवारांचा खळबळजनक दावा, राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांवरही निशाणा
Rohit Pawar Alleges BJP and NCP Leaders
| Updated on: Nov 03, 2026 | 6:55 PM

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. यात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच जय पवार आणि पार्थ पवार यांच्याबाबत एक धक्कादायक दावा व्यक्त केला आहे. यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. ते म्हणाले की, गमछावाल्या माणसाचं नाव मी सांगणार आहे. माझं प्रेझेन्टेशनही तयार आहे. त्यांचंही नाव मी तुम्हाला सांगणार आहे, असं म्हणत रोहित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, एमपीएससीचं आंदोलन सुरू असल्यामुळे पत्रकार परिषद घेता आली नाही. योग्य वेळेला हे प्रेझेन्टेशन दाखवण्यात येईल. दिवाळीनंतर या व्यक्तीचं ना घोषित करण्यात येईल. पार्थ पवार आणि जय पवारांमध्ये येत्या काळात वाद लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो. राष्ट्रवादीतील काही नेते आणि भाजपचे नेते असा प्रयत्न करू शकतात. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना एकटं पाडलं जातं आहे, असं म्हणत त्यांनी नाव न घेता सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांवर निशाणा साधला आहे.

Loading...

ते म्हणाले की, अमित शाहांना जे नेते भेटले त्यांना शरद पवारांनी संधी दिली. अजित पवारांसोबत असताना भुजबळ आणि मुश्रीफ सोडून इतर नेत्यांनी दादांना त्रास दिला आहे. जे अजित पवारांचे झाले नाहीत ते सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचे होणार नाहीत. भाजपअंतर्गत राजकारण पार्थ पवारांना कळेल, असं सांगितलं होतं. आता त्याला कळायला लागलं असेल. जय पवार काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांना भेटले होते. येत्या काळात दोन भावांमध्ये वाद लावला जाईल, असं रोहित पवार म्हणाले आहे.

रोहित पवारांनी सांगितलं की, राजकीय दृष्टीकोनातून वाद लावण्यात आले आहेत. भुजबळ आणि मुश्रीफ सोडून इतर नेते पार्थ पवार आणि जय पवारांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादीचा कंट्रोल घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा पवारांना अवगत करू इच्छितो. भाजपची आणि राष्ट्रवादीचे भेट तुम्हाला समजून घ्यावं लागेल. भुजबळ आणि मुश्रीफांना सोडून अजितदादांचा पक्ष कर्तृत्वामुळे सत्तेत पक्ष आलेला आहे. येत्या काळात भावाभावांमध्ये वाद लावल्याशिवाय राहणार नाहीत, असं त्यांनी सांगितलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us