मराठवाड्यात विद्यापीठाअंतर्गत शैक्षणिक मूल्यांकनाला वेग, अपुऱ्या सुविधा असलेल्या कॉलेजची धडधड वाढली

| Updated on: Feb 04, 2022 | 7:08 PM

मराठवाड्यातील कॉलेजचे मूल्यांकन करण्यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित केले असून त्याद्वारे पहिल्यांदाच महाविद्यालयांचे शैक्षणिक मूल्यांकन केले जात आहे. जवळपास 310 महाविद्यालयांकडून यासाठीचे प्रस्ताव आले होते

मराठवाड्यात विद्यापीठाअंतर्गत शैक्षणिक मूल्यांकनाला वेग, अपुऱ्या सुविधा असलेल्या कॉलेजची धडधड वाढली
Follow us on

औरंगाबाद: मराठवाड्यातील विद्यापीठाअंतर्गत (University) महाविद्यालयांच्या शैक्षणिक मूल्यांकन (Educational Audit) प्रक्रियेने आता गती घेतली आहे. आजी आणि माजी कुलगुरुंच्या अध्यक्षतेखालील चार समित्यांमार्फत 15 फेब्रुवारीच्या आत हे काम पूर्ण केले जाणार असून आतापर्यंत 69 महाविद्यालयांचे शैक्षणिक मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच उर्वरीत महाविद्यालयांकडून (Collages in Marathwada) प्राप्त झालेल्या आक्षेपांची पडतालणी आणि सुनावणीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यामुळे ज्या महाविद्यालयांकडे पायाभूत सुविधांचा अभाव आहे, अशी महाविद्यालये मात्र चिंतेत आहेत. मूल्यांकनावरच संलग्नता अवलंबून राहणार असल्यामुळे सुविधांचा अभाव असलेली महाविद्यालये अडचणीत येणार आहेत.

मूल्यांकनासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर

मराठवाड्यातील कॉलेजचे मूल्यांकन करण्यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित केले असून त्याद्वारे पहिल्यांदाच महाविद्यालयांचे शैक्षणिक मूल्यांकन केले जात आहे. जवळपास 310 महाविद्यालयांकडून यासाठीचे प्रस्ताव आले होते. मात्र कोरोनामुळे या प्रस्तावाच्या पडताळणीसाठी मागील दोन वर्षांपासून सतत अडचणी येत होत्या. आता नवीन कायद्यानुसार, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दोन जिल्ह्यांतील महाविद्यालयांच्या शैक्षणिक मूल्यांकनाची जबाबदारी सोपवली तर माजी प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांच्या अध्यक्षतेखालील समिती प्रत्येकी एका जिल्ह्यातील महाविद्यालयांचे मूल्यांकन करत आहे.

तीन वर्षांसाठी मूल्यांकन

विद्यापीठाअंतर्गत मूल्यांकनाचा हा तीन वर्षांसाठीचा कालावधी असेल. मूल्यांकनात महाविद्यालयातील पायाभूत सुविधा अर्थात स्वतंत्र इमारत, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संशोधन केंद्र, प्राचार्यांचा अद्ययावत कक्ष, क्रीडांगण, प्राध्यापकांची विषयनिहाय भरती, भरती करताना पाळले गेलेले आरक्षण, संशोधन, गाइड, पेटंट, नॅक, माजी विद्यार्थी संघटना इत्यादी मुद्द्यांना गुण दिले जाणार आहेत. 75 टक्क्यांहून अधिक गुण असणाऱ्या महाविद्यालयांना ए ग्रेड, 60 ते 75 टक्क्यांपर्यंत गुणासाठी बी ग्रेड, 50 ते 60 गुणांसाठी सी ग्रेड आणि 40 ते 50 गुणांसाठी डी ग्रेड तर 40 टक्क्यांहून कमी गुणांसाठी नो ग्रेड दिला जाणार आहे.

इतर बातम्या-

Share Market : अर्थसंकल्पाचा प्रभाव संपला? शेअर बाजारात घसरणीचं सत्र, सेंन्सेक्ससह निफ्टी ‘डाउन’

खतरनाक बदला..! पैसे मागितले म्हणून तरुणाचा तिघांनी ‘असा’ घेतला सूड, Funny Video Viral