Video : अजित पवारांना पुन्हा आठवण आली आबांची, कार्यकर्त्यांना का म्हणाले हलक्या कानाचे राहू नका?

| Updated on: Feb 10, 2022 | 4:17 PM

कार्यकर्त्यांना सूचना करताना अजित पवारांना आर. आर, पाटलांची (R R Patil) पुन्हा आठवण आली, आबांबद्दल बोलताना ते म्हणाले. आम्ही या पक्षातम काल आलेला आणि जुना असा भेदभाव करत नसतो. कोणती राजकीय पार्श्वभूमी नसतानाही अनेकांना पदं मिळाली. आर, आर, पाटील असेच एक नाव आहे त्यांनी अनेक पद भूषवली, असे म्हणत पुन्हा आबांची आठवण काढली.

Video : अजित पवारांना पुन्हा आठवण आली आबांची, कार्यकर्त्यांना का म्हणाले हलक्या कानाचे राहू नका?
पुन्हा आली आबांची आठवण
Follow us on

औरंगाबादेतील गंगापूरमधील नगरसेवकांचं आज राष्ट्रवादीत (Ncp) इनकमिंग झाल्याचे दिसून आले. काही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलंय. त्यामुळे राष्ट्रवादीला आणखी बळकटी मिळताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला खिंडार पाडत मालेगावातही राष्ट्रवादीत मोठं इनकमिंग झाल्याचे पाहयला मिळालं. यावेळी कार्यकर्त्यांना सूचना करताना अजित पवारांना आर. आर, पाटलांची (R R Patil) पुन्हा आठवण आली, आबांबद्दल बोलताना ते म्हणाले. आम्ही या पक्षातम काल आलेला आणि जुना असा भेदभाव करत नसतो. कोणती राजकीय पार्श्वभूमी नसतानाही अनेकांना पदं मिळाली. आर, आर, पाटील असेच एक नाव आहे त्यांनी अनेक पद भूषवली, असे म्हणत पुन्हा आबांची आठवण काढली. तसेच आपल्याला लोकांसाठी काम करायचं आहे. पक्षपात करू नका, कुणाबद्दलही आकस बाळगू नका, सर्वांची कामं समतोलने करा. हलक्या कानाचे अजिबात होऊ नका, असे म्हणत अजित पवारांनी पुन्हा कान टोचले आहेत.

प्रत्येकाचा पक्ष वाढीवर भर

तसेच मविआ सरकार चांगलं काम करतंय, राज्यात जरी सरकारमध्ये एकत्र असलो तरी प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी सूचक प्रतिक्रिया यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राज्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचा चांगलाच बोलबाला पहायला मिळाला. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यावर राष्ट्रवादीचा नेहमीच भर राहिला आहे. आणि आज नगसेवकांच्या प्रवेशानं पुन्हा ते दिसून आलं आहे. या नगरसेवकांच्या प्रवेशाने गंगापूरमध्ये राष्ट्रवादीचं पारडं जड झालं आहे, एवढं मात्र नक्की. पदवीधर मतदारसंघात आपल्याला चांगलं यश मिळालं आहे, मात्र तालुका पातळीवर वेगळं चित्र दिसतं, त्यामुळे या पातळीवर जास्त काम करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

परभणीत राष्ट्रवादीचं मेरीट वाढलं

आपल्यावर जबाबदारी मोठी आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत, मात्र ते सोडवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरू आहेत, कोरोनामुळे अर्थकरणावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही अजित पवार म्हणाले. येणाऱ्या काळातील निवडणुका, मग त्या ग्रामपंचायतीच्या असो, नगरपंचायतीच्या असो, वा जिल्हा परिषदेच्या असो, त्या सर्व निवडणुका आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत असेही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना बजावलं आहे. पक्षातील प्रत्येक व्यक्ती आपली भूमिका मांडत असतो, त्यामुळे पक्षात प्रत्येकाला चांगला वाव आहे. गंगापूरमध्ये राष्टवादीचे मेरीट वाढलं आहे. या भागातले प्रश्न जास्तीत जास्त वेगाने सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असेही त्यांनी आश्वस्त केले.

Nitesh Rane Video: आधी तुरुंगाची हवा, नंतर आजारपण; जामीन मिळाल्यानंतर बाहेर येताच काय म्हणाले नितेश राणे?

मग मुख्यमंत्री गळ्याला बेल्ट का घालतात? दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर नितेश राणेंच्या सवालाच्या फैरी

सुपातले जात्यात जातायत, आधीच्याच पीठ झालं, सगळे चक्की पिसणार आहेत- चंद्रकांत पाटील