AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane Video: आधी तुरुंगाची हवा, नंतर आजारपण; जामीन मिळाल्यावर बाहेर येताच काय म्हणाले नितेश राणे?

नितेश म्हणाले की, न्यायालयाने निर्णय दिल्याबद्दल त्यांचे आभार. पोलिसांना जी जी मदत हवी होती, ती केली. पुढेही करेन. मी कुठल्याही तपास कार्यातून लांब गेलेलो नव्हतो. जेव्हा - जेव्हा संपर्क करण्यात आला, फोन आला, तेव्हा मदत केली.

Nitesh Rane Video: आधी तुरुंगाची हवा, नंतर आजारपण; जामीन मिळाल्यावर बाहेर येताच काय म्हणाले नितेश राणे?
नितेश राणे.
| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 5:15 PM
Share

सावंतवाडीः संतोष परब (Santosh Parab) हल्लाप्रकरणी अखेर जामीन मिळाल्यानंतर बाहेर पडल्या-पडल्या नितेश राणे (Nitesh Rane) थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री नेमकं अधिवेशनाच्या वेळी गळ्यात बेल्ट का घालतात, यांना ईडीच्या कारवाई सुरू झाल्यावर कोरोना कसा होतो, असा सवाल त्यांनी केला. शिवाय मला अडकवण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही त्यांनी केला. मी पुढील तपासणीसाठी रुग्णालतात जाणार आहे. पोलिसांना मदत करणार आहे. आतापर्यंत तपास कार्यात अडथळे आणले नाहीत. एक जबाबदार नागरिक म्हणून सगळ्यांना सहकार्य केले. जनतेला त्रास नको म्हणून मी स्वतःहून शरण आलो. मात्र, आता तब्येत बरी होईपर्यंत आराम करणार आहे. सध्या मतदारांना भेटू शकलो नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मी बरा झाल्यानंतर बोलेन, त्या दिवशी खूप लोकांचा बीपीचा त्रास सुरू होईल, असा इशाराही दिला. जाणून घेऊयात काय म्हणाले नितेश राणे.

फोन आला, मदत केली…

नितेश म्हणाले की, न्यायालयाने निर्णय दिल्याबद्दल त्यांचे आभार. पोलिसांना जी जी मदत हवी होती, ती केली. पुढेही करेन. मी कुठल्याही तपास कार्यातून लांब गेलेलो नव्हतो. जेव्हा – जेव्हा संपर्क करण्यात आला, फोन आला, तेव्हा मदत केली. कुठल्याही तपासकार्यात अडथळे आणले नाहीत. सगळी माहिती देत होतो आणि याही पुढे देणार आहे. मी विधिमंडळाचा सदस्य आहे. 2 वेळा निवडून आलेला प्रतिनिधी आहे. जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. त्यामुळे कुणीही माझे सहकार्य मागतात, तेव्हा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी सहकार्य करत होतो, असा दावा त्यांनी केला.

पळण्याचा विषय नाही…

नितेश म्हणाले की, पळण्याचा विषय आला नाही. पोलिसांनी अटक करण्याची गरज लागली नाही. ज्या दिवशी मी शरण आलो, त्याच्या 4 दिवसांपर्यंतही मला कोर्टाचं प्रोटेक्शन होतं. पण जे कोर्टाबाहेर घडलं, गाडी अडवण्यात आली, सहकाऱ्यांना केसेसमध्ये अडकवण्यात आलं. त्यामुळे मी विचार केला. सिंधुदुर्गाच्या लोकांना त्रास होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी सरेंडर झालो. मला हे अटक करू शकले नाहीत. मला 2 दिवसांची पीसी दिली. मग मी एमसीआरमध्ये होतो. मला आजही त्रास होतोय. कोल्हापूरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला, असला तरी मी एसएसपीएम रुग्णालयात दाखल होणार असल्याचे ते म्हणाले.

कशाचा त्रास होतोय?

नितेश म्हणाले की, मणका, पाठीचा त्रास, शुगर लो होतेय. त्याचा इलाज करणार, पण काही बोलले हा राजकीय आजार आहे. मग आरोग्य व्यवस्थेने ज्या-ज्या टेस्ट केल्या, त्या काही खोट्या होत्या का? आताच माझं बीपी चेक केलं, ते 152 आहे. ते काय खोटं असेल काय? कुणाच्याही तब्येतीबद्दल प्रश्न विचारणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतं का, असा सवाल त्यांनी केला.

प्रश्न आम्हीही विचारू शकतो…

प्रश्न आम्हीही विचारू शकतो, म्हणत नितेश यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? लतादीदींच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जातात. त्यावेळी कुठलाही बेल्ट नसतो. अधिवेशनावेळी ते आजारी कसे पडतात? चौकशीवेळीच त्यांना कोरोना कसा होतो? अशा सवालांच्या फैरी त्यांनी झाडल्या.

राजकारणाचा स्तर…

नितेश म्हणाले, कुणाच्याही आरोग्याबद्दल असे प्रश्न विचारणं, किती योग्य आहे, हे तपासणं गरजेचं आहे. राजकारणाचा स्तर किती खालावू शकतो, यावरही विचार करावा. आता मी आराम करणार आहे. दीड महिना मी मतदारसंघात गेलो नाही. गोव्याची जबाबदारी आहे. तिथेही गेलो नाही. तिथेही जाणार आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे काम आहे. तब्येत सांभाळून मी कामाला लागणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

इतर बातम्याः

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.