राम, सीता आणि लक्ष्मणाच्या भूमिकेत असलेल्या कलाकारांचं नाटक औरंगाबादेत का बंद पाडलं?

औरंगाबादेत नाटकादरम्यानच हायव्होल्टेज ड्रामा! विद्यार्थ्यांच्या नाटकावर कुणी घेतला आक्षेप?

राम, सीता आणि लक्ष्मणाच्या भूमिकेत असलेल्या कलाकारांचं नाटक औरंगाबादेत का बंद पाडलं?
नाटकादरम्यान, काय घडलं?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 11:17 AM

दत्ता कानवटे, TV9 मराठी, औरंगाबाद : औरंगाबादेत (Aurangabad) एका चालू नाटकादरम्यान हालव्होल्टेज ड्रामा घडला. विद्यार्थ्यांचं सुरु असलेलं नाटक अचानक बंद पाडण्यात आलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी (ABVP) राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या नाटकावर आक्षेप घेतला आणि चालू नाटक बंद पाडलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (Marathwada University) हा सगळा प्रकार घडला. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या भूमिकेत चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आल्याचा आक्षेप घेत काही जणांनी संताप व्यक्त केला होता. राम, लक्ष्मण आणि सीतेच्या अंत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेल्या भूमिकेमुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी चालू नाटक बंद पाडलं.

सीता आणि लक्ष्मणाच्या नात्यावरुन काही संवादांवर उपस्थित प्रेक्षकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर हा वाद वाढला आणि अखेर नाटक बंद पाडण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

सीता आणि लक्ष्मणाच्या नात्यात विनोदी आणि अपमानित करणारं सादरीकरण नाटकात करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी या नाटकीतील संवाद आणि पात्रांवरुन गंभीर आरोप केले. भावना दुखावल्या गेल्यानं अखेर या नाटकावर प्रयोग बंद पाडण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद इथं युवा महोत्सव 2022 सुरु होता. या युवा महोत्सवाच्या स्टेज क्रमांक 3 इथं नाट्यरंग सुरु होता. यावेळी राम, सीता आणि लक्ष्मण अशी पात्र असलेलं एक नाटक सादर केलं जात होतं. या नाटकावेळी प्रेक्षकांमध्ये कुजबूज सुरु झाली.

नाटकातील लक्ष्मणरेषेच्या प्रसंगानंतर काही प्रवाशांनी दालनात उतरुन हा प्रयोग बंद पाडला. त्यानंतर स्टेजवरुन कलाकरांना आतमध्ये पाठवणयात आलं. यानंतर गोंधळ घालत या नाटाकाचा प्रयोग थांबवण्यात आला. तसं जय श्री रामच्या घोषणाही देण्यात आल्या. यानंतर नाटक पूर्ण करण्याची विनंतीही आयोजकांकडून करण्यात आली.

भावना दुखावल्याबाबत यावेळी दिलगिरीही व्यक्त कऱण्यात आली. मात्र आक्रमक झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाटक पूर्ण होऊ दिलं नाही. अखेर आयोजकांना हे नाटक थांबवावं लागलं होतं.

Non Stop LIVE Update
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.