देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, पोटनिवडणुकीतून माघारीनंतर दिल्ली दौरा!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. ते आज दुपारी एक वाजता दिल्लीत दाखल होणार आहेत.

देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, पोटनिवडणुकीतून माघारीनंतर दिल्ली दौरा!
Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 8:17 AM

मुंबई : भाजपाने (BJP) अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीच्या (Delhi) दौऱ्यावर आहेत. ते आज दुपारी एक वाजता दिल्लीत दाखल होणार आहेत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील माघारीनंतर फडणवीस याचा हा दौरा होत असल्यानं या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. देवेंद्र फडणवीस हे आपल्या या दौऱ्यामध्ये वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फडणवीस यांच्या या दिल्ली दौऱ्यामध्ये राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

पोटनिवडणूक माघारीनंतर दिल्ली दौरा

भाजपाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. या माघारीनंतर फडणवीस यांचा हा पहिला दिल्ली दौरा आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे राजकीय वतृळाचं लक्ष लागलं आहे. फडणवीस आज दुपारी एक वाजता दिल्लीमध्ये दाखल होतील. आपल्या या दिल्ली दौऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.  या भेटीमध्ये राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार

सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी घोषणा केली. भाजप अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल यांना तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आता भाजपाच्या माघारीमुळे लटके यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला आहे.

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.