AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रेकिंग! शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका, आता कशी आहे तब्बेत?

औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी! संजय शिरसाठ यांना हार्ट अटॅक

ब्रेकिंग! शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका, आता कशी आहे तब्बेत?
मोठी बातमीImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 18, 2022 | 8:45 AM
Share

दत्ता कानवटे, TV9 मराठी, औरंगाबाद : औरंगाबादचे शिंटे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat Heart attacked) यांना हृदयविकाराचा झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. संजय शिरसाट यांना औरंगाबादहून उपचारासाठी मुंबईला आणण्यात येतय. एअर अंबुलन्सने संजय शिरसाट यांना मुंबईला (Aurangabad Sanjay Shirsat) रवाना करण्यात आलंय. काल दुपारपासून औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी तातडीने उपचारासाठी त्यांना मुंबईला (Sanjay Shirsat News) रवाना करण्यात आलं.

काल दुपारच्या सुमारच्या सिग्मा रुग्णालयात आमदार शिरसाट यांना दाखल करण्यात आलं होतं. अस्वस्थ वाटत असल्यानं त्यांना रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं.

24 तासांच्या आत मुंबईसाठी रवाना

त्यानंतर 24 तासांच्या आतच त्यांना औरंगाबादहून मुंबईल उपचारासाठी नेलं जावं, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने दिला. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलंय.

संजय शिरसाट हे अनेक दिवसांपासून अस्वस्थ आणि नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळेही राजकीय वातावरण तापलं होतं. अशातच आता त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी घडामोड समोर आलीय.

एअर एम्ब्युलन्सने मुंबईला

संजय शिरसाट यांना औरंगाबाद विमानतळावर जेव्हा आणण्यात आलं, तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी लगबगही विमानतळावर पाहायला मिळाली. त्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. औरंगाबादेतील डॉक्टरांशीही याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यांनी यावर बोलणं टाळलं.

अत्यंत तातडीने मुंबईला संजय शिरसाट यांना आणण्यात येतंय. मुंबईतल्या कोणत्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार आहे, याची माहिती समोर आलेली नाही. औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मुंबईला उपचारासाठी नेण्यात यावं, अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर त्यांना एअर एम्ब्युलन्सने मुंबईत आणलं जातंय.

कोण आहेत संजय शिरसाट?

संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहे. राजकारण येण्याआधी ते रिक्षा व्यावसायिक होते. 1985 साली त्यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. 2000 साली ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

2003 मध्ये संजय शिरसाट यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली होती. 2005 मध्ये ते पुन्हा नगरसेवक बनले होते. त्यानंतर 2009 साली पहिल्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या 2014 सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले.

औरंगाबादेत 2019मध्येही त्यांनी शिवसेनेच्या वतीने आमदारकीची निवडणूक लढवली होती. त्यातही त्यांचा विजय झाला होता. दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिरसाट यांनीही बंडखोरी केली होती. बंडखोरी केल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून लिहिलेल्या पत्राचीही तुफान चर्चा झाली होती.

आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.