AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : तुम्ही आयुष्यात चुकीच्या मार्गाने तर जात नाहीत ना? चाणक्यांचे हे संकेत एकदा तपासून पाहा

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी असे काही संकेत सांगितले आहेत, जेव्हा एखादा व्यक्ती हा चुकीच्या मार्गाने जाऊ लागतो, तेव्हा हे संकेत दिसून येतात. या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

Chanakya Niti : तुम्ही आयुष्यात चुकीच्या मार्गाने तर जात नाहीत ना? चाणक्यांचे हे संकेत एकदा तपासून पाहा
Chanakya Niti Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 12, 2026 | 11:14 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी आपल्या आयुष्यात अनेक चांगले आणि वाईट अनुभव घेतले, या अनुभवाचं सार चाणक्य यांनी आपल्या या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे. चाणक्य म्हणतात जेव्हा एखादा व्यक्ती वाईट मार्गावर चालू लागतो, तेव्हा त्याला काही संकेत मिळतात, हे संकेत लक्षात घ्यावेत, त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

मोठ्या आणि अनुभवी लोकांकडे दुर्लक्ष – चाणक्य म्हणतात जे लोक हे आपल्यापेक्षा मोठे असतात किंवा त्यांचा अनुभव मोठा असतो, अशा लोकांच्या सल्ल्याकडे चुकूनही दुर्लक्ष करता कामा नये, कारण त्यांनी आयुष्यात तो अनुभव घेतलेला असतो. मात्र जेव्हा आपण अशा लोकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा समजून जावं की आपल्या पतनाची सुरुवात झाली आहे.

अहंकार – चाणक्य म्हणतात व्यक्तीचा जर कोणता सर्वात मोठा शत्रू असेल तर तो म्हणजे त्याचा अंहकार. जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा गर्व झाला असेल तर समजून जा की तो चुकीच्या मार्गाने चालला आहे. त्यामुळे कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व होऊ देऊ नका. लक्षात ठेवा गर्वाचं घर हे नेहमी खाली असतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा अहंकार होतो, तेव्हा त्याला चांगलं काय आणि वाईट काय? यातील फरक कळत नाही, परिणामी त्याच्यावर पश्चातापाची वेळ येते.

शॉर्टकट – चाणक्य म्हणतात जे लोक यश मिळवण्यासाठी शॉर्टकट वापरतात अशा लोकांना काही क्षणापुरतं तर यश मिळतं, मात्र हे यश दीर्घकाळ टिकत नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा यशाला कधीही शॉर्टकट नसतो. तुम्ही जर यशासाठी शॉर्टकट वापरत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही तुमची फसवणूक करत आहात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप
शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
मोठी राजकीय घडामोड! शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण