Aurangabad | विद्यापीठाच्या ऑनलाइन पदवी परीक्षा आजपासून, अडीच लाख नोंदणी, कशी आहे तांत्रिक प्रक्रिया?

| Updated on: Feb 08, 2022 | 11:25 AM

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत याच्या आदेशानुसार आणि कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या सूचनेनुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा पदवीच्या ऑनलाइन परीक्षा घेत आहेत.

Aurangabad | विद्यापीठाच्या ऑनलाइन पदवी परीक्षा आजपासून, अडीच लाख नोंदणी, कशी आहे तांत्रिक प्रक्रिया?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
Follow us on

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada university) अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या पदवी परीक्षेला (Degree exams) आजपासून म्हणजेच 8 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. मागील वर्षीच्या ऑनलाइन परीक्षांमध्ये आलेल्या अडचणी लक्षात घेता, यंदाच्या परीक्षेच्या सॉफ्टवेअरमध्ये विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने (Online exams) अंशतः बदल केले आहेत. यंदा पदवी परीक्षेसाठी सुमारे 2 लाख 50 हजार विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत याच्या आदेशानुसार आणि कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या सूचनेनुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा पदवीच्या ऑनलाइन परीक्षा घेत आहेत.

लॉगिनच्या प्रक्रियेत बदल

यंदाच्या ऑनलाइन परीक्षेच्या लॉगिन प्रक्रियेत मागील वर्षाच्या तुलनेत काहीसा बदल करण्यात आला आहे. पेपर लॉगिन करण्यासाठी पूर्वी युझर आयडी PRN नंबर आणि पासवर्क म्हणून जन्मतारीख टाकावी वागत होती. मात्र आता विद्यार्थ्यांना पासवर्डमध्ये बैठक क्रमांक टाकावा लागणार आहे. मागील वर्षी जन्मतारीख टाकताना विद्यार्थ्यांकडून चुका होत होत्या. तारखेच डॉट असल्याने विद्यार्थी गोंधळात पडत होते. त्यामुळे पेपर लॉगिन होण्यासाठी समस्या निर्माण होत होती. यांदा मात्र या पद्धतीत बदल करण्यात आला आहे.

ऑनलाइन परीक्षेची प्रक्रिया कशी?

– विद्यार्थ्यांनी एकदा पेपरचे लॉगिन केल्यानंतर दुसऱ्या पेपरच्या वेळी केवळ पासवर्ड टाकून पेपर लॉगिन करता येईल.
– ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरला आहे, त्याच विद्यार्थ्यांचे PRN क्रमांक सॉफ्टवेअरमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
– परीक्षा अर्ज न भरणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षा देण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित विद्यार्थ्याचा पेपर उघडणार नाही, अशी व्यवस्था सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आली आहे.
– यंदाची परीक्षा विद्यार्थ्यांना सहज जावी, यासाठी तांत्रिक सुलभता देण्यात आली आहे. मात्र तरीही विद्यार्थ्यांना काही अडचण आलीच तर गोंधळून जाऊ नये, संबंधित महाविद्यालयातील ऑनलाइन परीक्षा समन्वयकांशी संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी केले आहे.

इतर बातम्या-

एक से बढ़कर एक जुगाडू | Desi Jugaad Video : बसमध्ये सीट मिळवण्यासाठी असं काही करू नका, नाहीतर…

लता मंगेशकर यांच्यासाठी मनसेचा आर्ट गॅलरी बांधण्याचा निर्णय