Crime: बचत गटवाल्या चौकडीने औरंगाबादेतल्या वकील महिलेलाही फसवलं, 18 लाखांचा गंडा घातल्याचं उघड

| Updated on: Nov 01, 2021 | 2:59 PM

वकील महिलेची चौकडीतील एकाशी आधी एका फौजदारी प्रकरणादरम्यान ओळख झाली होती. यावेळी त्याने राजमाता इंटरप्रायजेस या संस्थेमार्फत बचत गटातील महिलांना मोफत शेळी वाटप करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर कंपनीच्या विविध कामांसाठी त्याने वकील महिलेकडून लाखो रुपये उकळले.

Crime: बचत गटवाल्या चौकडीने औरंगाबादेतल्या वकील महिलेलाही फसवलं, 18 लाखांचा गंडा घातल्याचं उघड
इंदापूर भिशी फसवणूक प्रकरणात अखेर गुन्हा दाखल
Follow us on

औरंगाबादः बचत गटामार्फत शेळी पालनाचा व्यवसाय करण्याचे अमिष दाखवून सुमारे दीडशे महिलांची फसवणूक( Fraud in Aurangabad) करणाऱ्याचे प्रकरण काल उघडकीस आले होते. सम्यक बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचलित राजमाता इंटरप्रयजेस नावाच्या संस्थेमार्फत चौघांनी महिलांना लुबाडल्याचे दोन दिवसांपूर्वी उघड झाले होते. एमआयडीसी सिडको ठाण्यात (CIDCO MIDC Police station) याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच चौकडीने एका वकील महिलेलाही तब्बल 18 लाखांडा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे.

कोण आहे ही भामटी चौकडी?

पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार राजमाता एंटरप्रायजेस संस्थेची अध्यक्षा निकिता गोकूळ कांबळे, विकास रामभाऊ मुळे, अमोल मोरे आणि विठ्ठल खांडेभराड अशी या चार आरोपींची नावं आहे. यांनीच सम्यक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत राजमाता एंटरप्रायजेस ही संस्था स्थापन करून त्याद्वारे अनेक महिलांना व्यवसाय सुरु करण्याचे अमिष दाखवले. या मार्फत दीड लाख रुपये महिलांकडून उकळले आहेत. तसेच आता वकील महिलेचीही फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. पोलीस या चोघांचा शोध घेत आहेत.

ट्रेडिंग कंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली वकिलाला फसवले

राजमाता इंटरप्रायजेस नावाच्या संस्थेमार्फत चौघांनी न्यायनगरमधील एका 32 वर्षीय वकील महिलेची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पोलिस आयुक्तालयात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, वकील महिलेची चौकडीतील एकाशी आधी एका फौजदारी प्रकरणादरम्यान ओळख झाली होती. यावेळी त्याने राजमाता इंटरप्रायजेस या संस्थेमार्फत बचत गटातील महिलांना मोफत शेळी वाटप करत असल्याचे सांगितले होते. तसेच महिलेलादेखील शेळी वाटपाच्या कार्यक्रमाला बोलावले होते. यादरम्यान त्याने संस्थेसाठी केंद्र शासनाकडून सात कोटींचा निधी आणल्याचेदेखील सांगितले. या व्यतिरिक्त बरेच उपक्रम संस्थेमार्फत राबवले जात असल्याची माहिती दिली होती. याद्वारे आपण लवकरच स्टार व्हिजन-21 ही ट्रेडिंग कंपनी सुरु करत असल्याचीही सांगितलं होतं.

महिला वकीलाला उद्घाटनाला बोलावलं…

24 जानेवारी 2021 मध्ये विकासने कंपनीचे उद्घाटन केले. त्यासाठी त्याने मुंबई-पुण्याहून प्रतिष्ठित व्यक्ती आल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत वकील महिलेची ओळखही करुन दिली. आता कंपनीचे उद्घाटन झाल्यामुळे खात्यावर पैसे जमा होतील, असे सांगितले. पण अजूनही काही छोटी-मोठी कामे राहिली असून त्यासाठी तीन लाखांची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यामुळे महिलेने मैत्रीण आणि नातेवाईकांकडून तीन लाख रुपये जमा करून दिले. त्यानंतरही गुंतवणूकदार येत आहेत. त्यांच्या राहण्याची सोय करण्याच्या नावाखाली पुन्हा पैसे उकळणे सुरु ठेवले. तसेच बीडच्या एका सेमिनारसाठीही एक लाख रुपये घेतले

अचानक कंपनीचे कार्यालय बंद केले

या सर्व पैसे उकळण्याच्या प्रक्रियेत प्रमुख आरोपी विकास मुळे याने वकील महिलेला कधी पाच तर कधी दहा हजार रुपये परत केले. पण उर्वरीत पैसेदेखील लवकरच देण्याचे आश्वासन दिले. मात्र नंतर अचानक राजमाता एंटरप्रायजेस संस्थेचे कार्यलय बंद केल्याचे महिला वकिलाला कळले. त्यांनी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रेडिंग कंपनीचे कार्यालयही बंद दिसले. धक्कादायक म्हणजे जुलै 2021 पासून मोबाइलही बंद केले. तोपर्यंत विकास मुळे व त्याच्या साथीदारांनी या महिलेकडून 18 neK दहा हजार रुपये उकळले होते. 15 सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्तांकडे याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून ऑक्टोबरपर्यंत मात्र कुठलीही ठोस कारवाई झालेली नव्हती.

इतर बातम्या-

मुस्लिम आरक्षणासाठी 27 नोव्हेंबरला ‘चलो मुंबई’, खासदार इम्तियाज जलील यांचं आवाहन

औरंगाबादः हिंदूंच्या घरावर बुलडोझर फिरवल्यास शिवसेनेला गंभीर परिणाम भोगावे लागतील, प्रवीण दरेकरांचा इशारा