कोरोना रुग्णांना अतिरिक्त बिल लावणाऱ्या हॉस्पिटल्सना नोटिसा, औरंगाबाद महापालिकेची कारवाई!

| Updated on: Jan 12, 2022 | 1:56 PM

तिरिक्त बिल घेतलेल्या रुग्णालयांची यादी महापालिकेला जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली. त्यानुसार, संबंधित 12 रुग्णालयांना नोटिसा जारी करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.

कोरोना रुग्णांना अतिरिक्त बिल लावणाऱ्या हॉस्पिटल्सना नोटिसा, औरंगाबाद महापालिकेची कारवाई!
औरंगाबाद मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय
Follow us on

औरंगाबादः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना अवाढव्य बिल आकारणाऱ्या हॉस्पिटलविरोधात महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून अतिरिक्त बिल वसूल केल्याप्रकरणी महापालिकेने शहरातील 12 रुग्णालयांना नोटीसा पाठवल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून विविध रुग्णालयांची तपासणी ऑडिटरमार्फत करण्यात आली होती. अतिरिक्त बिल घेतलेल्या रुग्णालयांची यादी महापालिकेला प्रशासनाकडून प्राप्त झाली. त्यानुसार, संबंधित 12 रुग्णालयांना नोटिसा जारी करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांनी दिली.

सखोल चौकशी अहवाल जिल्हा प्रशासनाच्या हाती

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या अचानकपणे वाढली होती. रुग्णांची ऑक्सिजनची पातळी झपाट्याने कमी होत होती. त्यामुळे बहुतांश रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत होती. अशा स्थितीत बेड्स मिळणे कठीण होते. जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांकडून किती बिल आकारावे, यासंबंधीचे नियम ठरवून दिले होते. मात्र हे नियम धाब्यावर बसवत काही रुग्णालयांनी मोठ्या प्रमाणात बिलांची वसुली केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार, प्रशासनाने शासकीय ऑडिटर्समार्फत विविध रुग्णालयांच्या बिलांची सखोल चौकशी केली होती. हा सखोल चौकशी अहवाल अलीकडेच जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. सदर रुग्णालयांवर कारवाई करावी, अशा सूचना मनपाला प्राप्त झाल्या आहेत. महापालिकेनेही संबंधित 12 रुग्णालयांना वनोटीस दिली मात्र त्यांची नावं उघड करण्यास नकार देण्यात आला आहे.

इतर बातम्या-

अभिनेत्री नेहा पेंडसेला कोरोनाची लागण, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

Molnupiravir | कोरोनावरील उपचारासाठी मोलनुपिरावीर नको; परिणामकारक नाही उलट तिचे दुष्परिणाम?