औरंगाबाद लेबर कॉलनीः बुलडोझर दिसले तरीही भीती, प्रचंड अस्वस्थता, पालकमंत्र्यांकडून मुदतवाढ मिळण्याची आशा

| Updated on: Nov 08, 2021 | 8:42 AM

औरंगाबादः लेबर कॉलनीतील घरे रिकामी करण्यासाठीची मुदत आज संपली असून महापालिका आज कधीही येथील घरांची पाडापाडी करू शकते. अवैध मालकी आणि जीर्ण वसाहती अशा दोन कारणामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी येथील वसती जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारच्या कारवाईच्या भूमिकेवर जिल्हाधिकारी ठाम असले तरीही शासन या प्रकरणी अत्यंत निर्दयीपणे वागत असल्याची तक्रार येथील रहिवासी करत आहेत. दरम्यान आज […]

औरंगाबाद लेबर कॉलनीः बुलडोझर दिसले तरीही भीती,  प्रचंड अस्वस्थता, पालकमंत्र्यांकडून मुदतवाढ मिळण्याची आशा
लेबर कॉलनीतील घरे रिकामी करण्याची मुदत आज संपली, त्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड अस्वस्थतेचं वातावरण आहे.
Follow us on

औरंगाबादः लेबर कॉलनीतील घरे रिकामी करण्यासाठीची मुदत आज संपली असून महापालिका आज कधीही येथील घरांची पाडापाडी करू शकते. अवैध मालकी आणि जीर्ण वसाहती अशा दोन कारणामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी येथील वसती जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारच्या कारवाईच्या भूमिकेवर जिल्हाधिकारी ठाम असले तरीही शासन या प्रकरणी अत्यंत निर्दयीपणे वागत असल्याची तक्रार येथील रहिवासी करत आहेत. दरम्यान आज सोमवारी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या कारवाईप्रकरणी ते काय निर्णय घेतील, यावर लेबर कॉलनीचे भवितव्य अवलंबून असेल. रहिवाशांनी उपोषण करून पालकमंत्र्यांसमोर साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे.
आज सकाळीच कॉलनी परिसरात एक बुलडोझर दिसले. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये प्रचंड घबराहट निर्माण झाली. लोक एकत्र जमू लागले.  रविवारपासूनच येथील लोक घोळक्या घोळक्याने फिरत असून, कॉलनीत येणाऱ्या प्रत्येकावर नजर ठेवली जात आहे.

आठ दिवसाची मुदत संपली, आता पुढे काय?

31 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महापालिकेने लेबर कॉलनीत पोलिसांचा मोठा फौजफाटा आणत आठ दिवसात घरे रिकामी करा, असे फ्लेक्स लावले. त्या दिवसापासून येथील रहिवाशांची झोप उडाली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दिलेली ही घरे निवृत्तीनंतरही कुटुंबियांनी सोडलीच नाहीत, त्यावर भाडेकरू, पोटभाडेकरू ठेवले तसेच काही घरांची बाँडपेपरवर विक्रीही केली आहे. ही अवैध मालकी सोडण्याची नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली आहे. तसेच येथील घरे अत्यंत जीर्ण झाल्याचा अहवाल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समितीने दिला आहे. या दोन कारणास्तव जिल्हा प्रशासनाला या जागेवरील बेकायदेशीर कब्जेदारांना हटवायचे आहे.

लेबर कॉलनीवासियांत प्रचंड अस्वस्थता

सोमवारी महापालिकेचे बुलडोझर कॉलनीत येणार या धास्तीने लेबर कॉलनीतील रहिवाशांमध्ये रविवारपासून प्रचंड अस्वस्थता होती. सतत काही मिनिटांनी एक नवी अफवा पसरते, सगळे घाबरून जातात, असं वातावरण होतं. काल काही कामानिमित्त वीज कर्मचारी लेबर कॉलनीत आले असता आता आपल्या घराचे वीज कनेक्शन कट करतात का, अशी धास्ती त्यांना वाटत होती. कॉलनीतील तरुण वर्गाचा एक गटच कॉलनीत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर पाळत ठेवून आहे. सरकारी गणवेशातील एखादी व्यक्ती आली तरी येथील रहिवासी आक्रमक होत आहेत.

काहींनी आशा सोडल्या, घरेही सोडली

प्रशासन आपल्या कारवाईच्या भूमिकेवर ठाम असल्याने शेवटच्या दोन दिवसांत येथील काही घरे रिकामी झाली. रविवारी दुपारनंतर आणि रात्रीतून काही जणांनी भीतीपोटी आपल्या सामानाची बांधाबांध केली आणि टेम्पोमध्ये सामान टाकून इतरत्र स्थलांतर केले. त्यामुळे मूळ जागेच्या मालकीचा मुद्दा लावून धरलेल्या रहिवाशांनाही आता चिंता वाटत आहे. कॉलनीतील एक एक जण असा सोडून जाऊ लागला तर एकजुटीने प्रश्न मांडण्याची ताकद उरणार नाही, अशी भीती त्यांना वाटत आहे.

प्राण गेले तरी चालेल, पण घर सोडणार नाही

प्रशासन कारवाईवर ठाम असल्याने आता कुणीही मदत करणार नाही, या विचाराने काही जण घरे सोडत असले तरीही येथील काही रहिवासी आपल्या मतांवर ठाम आहेत. जीव गेला तरी चालेल पण इथले घर सोडणार नाही, अशी भूमिका येथील नागरिकांची आहे.

स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये घरांची तपासणी केलीच नाही- रहिवासी

लेबर कॉलनीतील सर्वच घरांचे स्ट्रक्चरल ऑढिट नियमाप्रमाणे झाले नाही. येथील घरे अजूनही सुस्थितीत आहेत. त्याची दरवर्षी देखभाल केली जाते. काही घरे तर अत्यंत मजबूत स्थितीत आहेत. पण ऑडिट करणाऱ्यांनी केवळ या भागातील रहिवाशांचे नाव, घराचा नंबर, किती वर्षांपासून येथे राहत आहात, अशी चौकशी केली व तपासणी न करताच रिपोर्ट दिला. त्यामुळे या रिपोर्टच्या आधारे प्रशासन करत असलेली कारवाई अन्यायकारक आहे, अशी प्रतिक्रिया येथील रहिवासी रतन शिंदे यांनी दिली.

इतर बातम्या-

जागेचं अधिग्रहणच नाही, तर कारवाई कसली करताय? औरंगाबादच्या सर्वात मोठ्या वादाचा Ground Report